White Lung Syndromes:काही दिवसांपासून चीनमध्ये धूमाकूळ घालणाऱ्या गूढ न्यूमोनियामुळे जगाची चिंता वाढवली. चीनमध्ये या आजाराचा उद्रेक झालेला असताना आता अमेरिका आणि नेदरलॅंडमध्ये ही या आजाराचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे, या आजाराविषयी जगभरात भीती व्यक्त केली जात आहे.
चीनमध्ये लहान मुलांना या गूढ आजाराची लागण झाल्याने आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे. चीनमध्ये उद्रेक झालेल्या या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला ‘व्हाईट लंग सिंड्रोम’ असे नाव दिले आहे.
चिंतेची बाब म्हणजे हा व्हाईट लंग सिंड्रोम आजार जगभरातील अनेक देशांमध्ये पसरत आहे. या आजाराचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर होतो. हा व्हाईट लंग सिंड्रोम आजार आहे तरी काय? आणि याची लक्षणे कोणती? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
व्हाईट लंग सिंड्रोम हा आजार नेमका आहे तरी काय?
चीनमध्ये सर्वात आधी आढळलेला या गूढ न्यूमोनियाला आता व्हाईट लंग सिंड्रोम हे नाव देण्यात आले आहे. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हा जिवाणू या आजारामागचे प्रमुख कारण असू शकते, असे सांगितले जाते.
या आजाराचा माणसाच्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. या आजाराची लागण झाली की, बाधित रूग्णांच्या फुफ्फुसांना सूज येते आणि ते पांढरे दिसू लागतात. धक्कादायक बाब म्हणजे अशा स्थितीमध्ये रूग्णाचा एक्स-रे घेतल्यानंतर जो रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टमध्ये फुफ्फुसे पांढरे दिसतात. त्यामुळे, या आजाराला व्हाईट लंग सिंड्रोम असे नाव देण्यात आले आहे.
वाचा व्हाईट लंग सिंड्रोम या आजाराची लक्षणे कोणती?
- सतत छातीत दुखणे
- थकवा जाणवणे
- ताप येणे
- थंडी जाणवणे
- सर्दी आणि खोकला
- श्वास घेण्यास त्रास होणे
- अशक्तपणा येणे
या आजारापासून असा करा बचाव
या आजाराचा धोका टाळण्यासाठी तुमचे दोन्ही हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. जर तुम्हाला सौम्य ताप आला असेल तर, ताबडतोड डॉक्टरांचा सल्ला घ्या. सर्दी-खोकला झाल्यास मास्कचा वापर करा.
स्वत:ला आयसोलेटेड ठेवा. तसेच, या स्थितीमध्ये तुमचा आहार सकस आणि संतुलित ठेवा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.