माझ्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी; उद्धव ठाकरे भाजपवर संतापले

Uddhav Thackeray's warning to Fadnavi sIt will not work if we keep the law and you keep these pigs
Uddhav Thackeray's warning to Fadnavi sIt will not work if we keep the law and you keep these pigs

मुंबई l मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागेवरून सरकारवर विरुध्द विरोधक असा वाद सुरु आहे. आरेचा निर्णय अहंकारातून घेतल्याचा आरोप विरोधकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर Uddhav thackeray केला होता. त्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी आज प्रतिउत्तर दिले. मी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी अहंकारी असल्याचं ठणकावून सांगितले.

 

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. आरे कारशेड मेट्रो साठी करत होतो. त्या ठिकाणी ३० हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्यापैकी हेक्टर जागेमध्ये घनदाट जंगल होतं.

 

उर्वरित २५ हेक्टर जागा ही आपल्याला कमी पडणार होती. त्यानंतर आपल्याला जंगल मारत मारत ही जागा कमी वाढवावी लागली असती. म्हणून त्या ठिकाणी कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

मेट्रोसाठी आपल्याला स्टेंबलिंग लाईनची आपल्याला आवश्यकता आहे. पहिल्या प्रकल्पात स्टेंबलिंग लाईनचा प्रस्ताव नव्हता हे पाहून मला धक्का बसला. आरेमध्ये आपण पर्यावरण वाचवलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्तीही आपण वाढवली.

 

कांजूरमार्गला आपल्याला ४० हेक्टर जागा मिळली होती. काजूरमार्गची जागा ओसाड आहे. कांजूरमार्गला मेट्रोच्या , आणि या मार्गिकेंच्या कारशेड करता येणार होणार होत्या. यात एक मोठा फरक आहे. जिकडे एका मार्गिकेसाठी कारशेड होणार होती तिकडे अन्य लाईनसाठीही कारशेड करता येणार आहे. केवळ एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी?,” असा सवालही त्यांनी यावेळी केला.

 

आरेमध्ये केल्यास त्याचा वापर केवळ पुढच्या पाच वर्षांसाठी होणार होता. परंतु काजूरमध्ये केल्यास त्याचा वापर पुढच्या ४० वर्षांसाठी करता येईल. कांजूरमधून आपल्याला थेट अंबरनाथ, बदलापूरपर्यंत मेट्रो नेता येणार आहे.

 

हेही वाचा : भाजपला झटका l RLP शेतकरी आंदोलनावरून एनडीएतून बाहेर, 2 लाख शेतकऱ्यांसह आंदोलनाला पाठिंबा

आपल्या विरोधात केंद्र व न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे,” असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here