चंद्रकांत पाटील – देवेंद्र फडणवीस ही अस्वस्थ जोडी शकुनी डाव टाकणारच

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरींचा भाजपवर हल्लाबोल

cm-uddhav-thackeray-meeting-with-pm-narendra-modi-ncp-targets-devendra-fadnavis-and-chandrakant-patil-ncp-mla-amol-mitkari
cm-uddhav-thackeray-meeting-with-pm-narendra-modi-ncp-targets-devendra-fadnavis-and-chandrakant-patil-ncp-mla-amol-mitkari

मुंबई l महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांची भेट घेत आहेत. या भेटीत मराठा आरक्षण Maratha reservation या महत्त्वाच्या विषयासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिल्लीत भेट घेतली. या भेटीकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहेच, शिवाय महाराष्ट्रातील राजकीय पक्षही या भेटीकडे लक्ष ठेवून आहेत.CM-uddhav-thackeray-meeting-with-pm-narendra-modi-ncp-targets-devendra-fadnavis-and-chandrakant-patil-ncp-mla-amol-mitkari

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, ठाकरे-मोदी भेटीवरुन भाजपवर निशाणा साधला. अमोल मिटकरींनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल.

हेही वाचा: Heavy rains alert in Mumbai : चार दिवस धोक्याचे; मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा!

आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील. मात्र कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्याशिवाय राहणार नाही”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

अमोल मिटकरी यांचं ट्विट

याशिवाय अमोल मिटकरींनी दुसरं ट्विट करुन, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरही घणाघात केला. “अजून बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारवर बोलायला लागले.अर्थ स्पष्ट आहे भाजपा मानसिक दृष्ट्या थकलेला पक्ष झाला आहे. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसर त्यांच्याकडे काही शिल्लक नाही”, असं मिटकरी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here