सोन्याचा बर्गर खाण्यासाठी लोक लावत आहेत रांगा

Columbia-restaurant-in-makes-a-burger-containg-24-carat-gold-in-it
Columbia-restaurant-in-makes-a-burger-containg-24-carat-gold-in-it

कोलंबिया : बर्गरला आलू टिक्की, सॉस, चीज आणि विविध भाज्या टाकून खास बनवलं जातं. मात्र बर्गरबाबत ही बातमी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. एका कोलंबियन रेस्टॉरंटनं Columbia २४ कॅरेट सोन्याचं gold गोल्ड बर्गर golden burger बनवलं आहे.

सोन्याच्या या बर्गरचं नाव ठेवलं आहे ऑरो मॅककॉय. हे ऑरो मॅककॉय २७ नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. डबल मीट आणि डबल चीजसह २४ कॅरेट सोनं वापरून हे बर्गर बनलं आहे. अनेक लोक फक्त या कबर्गरला पाहण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये येत आहेत. जमलेल्या गर्दीतील लोक सतत विचारत आहेत, की हे बर्गर खरोखर सोन्याचं बनलेलं आहे का?

 

View this post on Instagram

 

A post shared by TORO McCOY® (@toromcoy)

सोशल मीडियावरही सोन्याच्या बर्गरचे फोटो व्हायरल

सोशल मीडियावरही या सोन्याच्या बर्गरचे फोटो व्हायरल झालेत आहेत. लोक सोशल मीडियावर बर्गरच्या फोटोजखाली कमेंट्स करून किंमत विचारत आहेत. बर्गरची किंमत आहे तब्बल ४१९१ रुपये!

बर्गरला प्लास्टिकमध्ये पॅक करुन सोन्याचा वर्ख लावतात

रेस्टॉरंटची शेफ मारिया पाऊला हिचं म्हणणं आहे, की या बर्गरला आधी प्लास्टिकमध्ये लपेटलं जातं. मग त्याच्यावर सोन्याचा वर्ख लावला जातो. या बर्गरला खाण्याआधीच चाहते त्याच्या रंग-रूपावर फिदा होत आहेत.

हेही पाहा : Photo : गौहर खान आणि जैद दरबारचं खास फोटोशूट

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here