LPG Gas Cylinder Price Hike l एलपीजी सिलेंडरचा पुन्हा भडका; ४३ रुपयांनी वाढले दर!

गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०२१ मध्ये आतापर्यंत एकूण ४०४.५० रुपयांची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत प्रति व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १३३२ रुपये इतकी होती. जी आता अवघ्या ९ महिन्यांत थोड्या थोड्या वाढ होऊन १७३६.५० रुपयांवर पोहोचली आहे.

commercial-gas-cylinder-price-hiked-by-rupees-43-update
commercial-gas-cylinder-price-hiked-by-rupees-43-update

नवी दिल्ली l पेट्रोलियम कंपन्यांनी आता व्यावसायिक लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ४३ रुपयांची (LPG Gas Cylinder Price Hike) वाढ केली आहे. किंमतीतील या वाढीनंतर, आता दिल्लीतील १९ किलोच्या व्यावसायिक प्रति सिलेंडरची किंमत आता १७३६.५० रुपये इतकी झाली आहे. हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळे, आज शुक्रवार (१ ऑक्टोबर) व्यावसायिक गॅस सिलेंडर खरेदी करताना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

तर, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे, सर्वसामान्यांना नक्कीच काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, यापूर्वी अवघ्या महिन्याभरापूर्वी म्हणजेच १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ७५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

Petroleum companies increase price of commercial LPG cylinders by Rs 43. Price of a 19 kg commercial cylinder in Delhi now Rs 1736.50. On Sept 1st, price of commercial LPG cylinder was increased by Rs 75. New rates effective from today. No change in domestic LPG cylinder rates.

— ANI (@ANI) October 1, 2021

अवघ्या ९ महिन्यांत ४०४.५० रुपयांची वाढ

नमूद केल्याप्रमाणे, गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये देखील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती ७५ रुपयांनी वाढल्या होत्या. त्याआधी ऑगस्टमध्येही किंमती दुप्पटीने वाढल्या होत्या. खरं पाहायला गेलं तर, इंडेनच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०२१ मध्ये आतापर्यंत एकूण ४०४.५० रुपयांची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत प्रति व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १३३२ रुपये इतकी होती. जी आता अवघ्या ९ महिन्यांत थोड्या थोड्या वाढ होऊन १७३६.५० रुपयांवर पोहोचली आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर हा हॉटेल्स, ढाबे आणि सार्वजनिक भोजनालयांमध्ये अधिक होतो. त्यामुळे, आता दर वाढल्याने हॉटेलिंग महाग होऊ शकतं. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती ८८४.५० रुपयांवर स्थिर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here