निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संवाद- समन्वय आवश्यक

औरंगाबादचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रतिपादन

Communication and coordination is necessary to maintain law and order in elections
Communication and coordination is necessary to maintain law and order in elections

औरंगाबाद : निवडणूक प्रक्रिया राबवितांना विविध पातळ्यांवर अनेक घटना घडामोडी आवश्यक असतात. अशा प्रसंगी कायदा व सुवव्यवस्था राखण्यासाठी निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांचे आपापसात संवाद- समन्वय असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.

आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी घेतला. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अति. पोलीस अधीक्षक लांजेवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा व करण्यात आलेल्या व्यवस्थांची माहिती देण्यात आली.  निवडणूक प्रचार, मतदान व मतमोजणी दरम्यानच्या कालावधीत लागणारा पोलीस बंदोबस्त, केंद्रीय व राज्य सुरक्षा यंत्रणांची आवश्यकता यानुसार माहिती घेण्यात आली. मतदान केंद्रांच्या हद्दी निश्चित करणे, संवेदनशील  मतदान केंद्रांची यादी तयार करणे,  अतिरिक्त सुरक्षा बलाची मागणी करणे, झालेल्या कारवाईसंदर्भात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुलभ करणे इ. बाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस आयुक्त मनोज लोहिया व पोलीस अधीक्ष मनिष कलवानिया यांनीही पोलीस दलातर्फे होत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जिल्हा व तालुकापातळीवर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांचा आपापसात समन्वय व संवाद आवश्यक आहे. निवडणूकीशी संबंधित गुन्ह्यांबाबत कायद्यांचा अभ्यास करा. त्याची माहिती सहकारी अधिकाऱ्यांना द्या. कोणत्याही परिस्थितीत आपल्या जिल्ह्यातील निवडणूक ही निर्भय व निष्पक्ष वातावरणात व्हायला हवी हेच आपले लक्ष्य असू द्या,असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here