Bhai Jagtap | मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड

congress-appoints-bhai-jagthap-as-president-and-charan-singh-sapra-as-working-president-of-mumbai-congress committe
congress-appoints-bhai-jagthap-as-president-and-charan-singh-sapra-as-working-president-of-mumbai-congress committe

मुंबई l मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी Mumbai Congress President विधान परिषदेचे आमदार अशोक अर्जुनराव जगताप ऊर्फ भाई जगताप Bhai Jagtap यांची निवड झाली आहे. चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी Sonia Gandhi यांनी याला मंजुरी दिली आहे.

विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड Eknath Gaikwad यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले. अखेर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाली.

हेही वाचा : RSS l राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन

मोहम्मद आरिफ नसिम खान (प्रचार समितीचे, अध्यक्ष), डॉ. अमरजितसिंह मनहास (समन्वय समिती, अध्यक्ष), सुरेश शेट्टी (जाहीरनामा आणि प्रकाशन समिती, अध्यक्ष), चंद्रकांत हंडोरे (मुंबईचे प्रभारी), गणेश यादव (तपासणी आणि रणनीती समिती, सचिव), प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचानेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले?;शिवसेनेचा पंतप्रधान मोदींना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here