Congress Lok sabha Election 2024 Meeting : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठका

१८ जानेवारीपासून अमरावती येथून प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठकांना सुरुवात.

Cancel the candidature of BJP's Nitin Gadkari who misused Lord Rama for votes: Atul Londhe
Cancel the candidature of BJP's Nitin Gadkari who misused Lord Rama for votes: Atul Londhe

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व विभागात विभागनिहाय बैठकांचे Congress Lok sabha Election 2024 Meeting आयोजन केले आहे. १८ जानेवारी रोजी अमरावती येथून या बैठकांना सुरुवात होत आहे. 

नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका होत असून विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरे, आ. यशोमती ठाकूर, आ. प्रणिती शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, आ. कुणाल पाटील, राज्यातील माजी मंत्री, जिल्हा अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दोन सत्रात या बैठका होणार आहेत. विभागीय बैठक सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान व दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत होणार आहेत.

अमरावती विभागाची बैठक अमरावती येथे दिनांक १८ जानेवारी रोजी, नागपूर विभागाची बैठक गडचिरोली येथे दिनांक २० जानेवारी रोजी, पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुणे येथे दिनांक २३ जानेवारी रोजी, कोकण विभागाची बैठक भिवंडी येथे २४ जानेवारी रोजी, उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक धुळे येथे २७ जानेवारी रोजी तर मराठवाडा विभागाची बैठक लातूर येथे दिनांक २९ जानेवारी रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here