माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन; आज ७४ व्या वाढदिवशीच घेतला अखेरचा श्वास

congress-former-mla-madhukar-thakur-passed-away-news-update
congress-former-mla-madhukar-thakur-passed-away-news-update

अलिबाग l काँग्रेसचे माजी आमदार Congress Former Mla मधुकर ठाकूर Madhukar Thakur यांचं निधन झालं आहे. अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. आजच म्हणजे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो. दुर्दैवाने वाढदिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली.

मधुकर ठाकूर मागील तीन ते चार वर्षांपासून आजारी होते. झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि २००४ ते २००९ या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे ते आमदार होते.

रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. दुपारी २ वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

हेही वाचा

महागाईविरोधात छाती बडवणारे नेते आता तोंड उघडायला तयार नाहीत;शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here