‘गौतम अदाणींनी २० वर्षांत भाजपाला किती रुपये दिले?’ राहुल गांधींचा सवाल

karnataka-election-final-result-2023-congress-got-clear-majority-in-karnataka-bjp-defeated-news-update-today
karnataka-election-final-result-2023-congress-got-clear-majority-in-karnataka-bjp-defeated-news-update-today

नवी दिल्ली: हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदाणी उद्योग समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. या पडझडीमुळे उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) मागील काही दिवसांपून चर्चेत आहेत. असे असतानाच काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गौतम अदाणींचा उल्लेख करत भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. मागील २० वर्षांत अदाणींनी भाजपाला किती रुपये दिले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गौतम अदाणी यांच्यात जवळचे संबंध आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले. ते आज (७ फेब्रुवारी) संसदेत बोलत होते.

 आता अदाणी हे मोदी यांच्या विमानातून प्रवास करतात

“अगोदर मोदी अदाणी यांच्या विमानातून प्रवास करायचे. आता अदाणी हे मोदी यांच्या विमानातून प्रवास करतात. अगोदर हे फक्त गुजरातमध्येच व्हायचे, नंतर हे भारतात सुरू झाले. अदाणी यांनी भाजपाला मागील २० वर्षांत निवडणूक रोखे तसेच अन्य मार्गाने किती रुपये दिले?” अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

  अदाणी आणि पंतप्रधान यांच्यात काय संबंध आहेत…

“कोणत्याही रस्त्याने चालत जा, हा रस्ता कोणी बांधला असे विचारले, तर अदाणींचे नाव पुढं येते. हिमाचल आणि काश्मीरमधील सफरचंद हेदेखील अदाणींचे आहेत. अदाणी आणि पंतप्रधान यांच्यात काय संबंध आहे, हे संपूर्ण देशाला जाणून घ्यायचे आहे,” असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि अदाणींचे एक छायचित्र दाखवले.

 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर खरी जादू सुरु झाली

“२०१४ पूर्वी अदाणी जगातील श्रीमंताच्या यादीत ६०९ व्या क्रमाकांवर होते. पण, २०१४ मध्ये भाजपा सत्तेत आल्यावर अदाणी काही वर्षांतच दुसऱ्या स्थानावर पोहचले. त्यांचे आणि पंतप्रधानांचे संबंध काय आहेत? २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर खरी जादू सुरू झाली. काही वर्षांतच अदाणी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर पोहोचले,” असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here