राहुल गांधी इटली दौऱ्यावर; कारण…

congress-leader-mp-rajiv-satav-says-rahul-gandhis-gramdmother-is-serious-italy-tour
congress-leader-mp-rajiv-satav-says-rahul-gandhis-gramdmother-is-serious-italy-tour

नवी दिल्ली l आज काँग्रेसचा स्थापना दिवस असतानाही राहुल गांधी Rahul gandhi परदेशात गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपा नेत्यांकडून राहुल गांधींच्या परदेशात दौऱ्यावर जोरदार टीका सुरु आहे. टीकेला उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेते खासदार राजीव सातव Rajiv satav पुढे आले आहेत. सातव यांनी राहुल गांधींच्या इटली दौऱ्यामागचं italy-tour कारण सांगितलं आहे.

काँग्रेस नेते खासदार राजीव सातव एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की,जर आपल्या घऱातलं कोणी आजारी असेल तर कोणीही जाणार. राहुल गांधी यांच्या आजींची प्रकृती फार खराब आहे. त्यांना भेटण्यासाठी ते गेले आहेत.

राहुल गांधी यांनी फेब्रुवारी महिन्यातच करोनाचं भयंकर मोठं संकट येणार असल्याचं सांगितलं होतं. सरकारने लक्ष दिलं नाही. लाखो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत असताना सरकार लक्ष द्यायला तयार आहे का? गेल्या सहा वर्षापासून पंतप्रधान एकही पत्रकार परिषद घेण्यास तयार नाहीत. त्यावर तर कोणी बोलत नाही.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी न्हाव्यालाही रोजगार दिला नाही

देशासमोरच्या महत्वाच्या प्रश्नांना मोदी सरकारने कधी उत्तर दिलं नाही ही महत्वाची बाब आहे. आणि त्यावर ज्या एकमेव नेत्याने संघर्ष केला आहे ते म्हणजे राहुल गांधी आहेत,” असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “मोदींनी गेल्या सहा वर्षात अर्थव्यवस्थेची वाट लावली. लाखो शेतकरी रस्त्यावर बसले आहेत त्याबद्दल एक शब्द तुम्ही बोलत नाही. लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्यात त्याची चर्चा करायला तयार नाही. असंही राजीव सातव म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here