मोदी सरकारने विश्वासघात केला : सोनिया गांधी

राज्यांना जीएसटी नुकसान भरपाई देण्यास केंद्राचा नकार

congress-president-sonia-gandhi-video-conference-meeting-with-cms
congress-president-sonia-gandhi-video-conference-meeting-with-cms

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री बैठकीत जीएसटी नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारने आपण नुकसान भरपाई देऊ शकत नसल्याचं सांगणं म्हणजे विश्वासघात आहे असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

आज सोनीया गांधी यांनी बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी बोलताना सोनिया गांधी यांनी सांगितलं की, ११ ऑगस्ट झालेल्या अर्थ स्थायी समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने यावर्षी आपल्याला १४ टक्के जीएसटी नुकसान भरपाई देणं शक्य नसल्याचं सांगितलं. हा नकार म्हणजे मोदी सरकारने दिलेला विश्वासघात आहेत,” अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. 

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, हेमंत सोरेन,भूपेश बघेल, कॅप्टन अमरिंदरसिंग, श्री.व्ही नारायणस्वामी,अशोक गहलोत हे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यामध्ये या बैठकीत काँग्रेसचे चार आणि तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here