काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली त्यांनीच डल्ला मारला ;नाना पटोलेंचा शरद पवारांवर पलटवार!

शरद पवार मोठे आहेत, त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही असंच ठरलेलं आहे. परंतु, पक्षाबाबत त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे. खरंतर काँग्रेसने अनेक लोकांना जमीन राखायला दिलेली होती आणि जमीन राखणाऱ्या लोकांनीच जमीन चोरली, डाका मारला.

congress-state-president-nana-patole-targets-ncp-president-sharad-pawar-news-update
congress-state-president-nana-patole-targets-ncp-president-sharad-pawar-news-update

मुंबई l राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष (Nationalist Congress Party NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्याबाबत विविध प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्या आहेत. तर, काँग्रेसकडून देखील शरद पवारांच्या या विधानावर प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress State President) नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया देत, शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

नाना पटोले म्हणाले त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या नाही गेल्या पाहिजेत. असं मोठ्या व्यक्तिमत्वाला आम्ही लहान व्यक्ती सांगू शकतो. काँग्रेसने कधीही जमीनदारी केलेली नाही. काँग्रेस हा काही जमीनदाराचा पक्ष नाही. ज्या लोकांना काँग्रेसने पॉवर दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला, हे सातत्याने देशभरातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे.” असं नाना पटोले टीव्ही -9 बरोबर बोलताना म्हणाले आहेत.

तसेच, “सामान्य जनता आजही काँग्रेस सोबत आहे. देशामध्ये भाजपाला एकच पर्याय तो म्हणजे काँग्रेसचा आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण या पद्धतीच्या प्रतिक्रिया देऊन काँग्रेस नेतृत्वाच्या खच्चीकरणाचा जो प्रयत्न केला जातो. हे आता कदापि कुणी मान्य करत नाही, काँग्रेस नेतृत्वचं २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होईल.” असंही पटोले यांनी यावेळी बोलून दाखवलं.

काँग्रेस नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी म्हणणाऱ्या शरद पवारांना नाना पटोलेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

याचबरोबर, “शरद पवार मोठे आहेत, त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही असंच ठरलेलं आहे. परंतु, पक्षाबाबत त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे. खरंतर काँग्रेसने अनेक लोकांना जमीन राखायला दिलेली होती आणि जमीन राखणाऱ्या लोकांनीच जमीन चोरली, डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती आज झालेली असेल, असं त्यांचं मत असेल.” असं देखील नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे.

 शरद पवार नेमकं काय म्हणाले होते

“आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय.” असं शरद पवार एका मुलाखतीत म्हणालेले आहेत.

आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी – शरद पवार

याचबरोबर, विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहेत. काँग्रेची नेतेमंडळी राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असं सांगतात. यावर भाष्य करताना शरद पवार, “काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात.” असं देखील म्हणाले होते.

हेही वाचा

तरुणीने नाकारले प्रपोजल तर घरी सेक्स टॉइज पाठवू लागला तरुण, पोर्न साइटवर टाकला पीडितेचा फोटो आणि फोन नंबर

Atmaram Tomar l भाजपच्या माजी मंत्र्याची हत्या,राहत्या घरात सापडला मृतदेह!

Ganesh Chaturthi 2021l गणपतीची स्थापना, पूजेची पूर्व तयारी आणि विसर्जनाची वेळ जाणून घ्या एका क्लिकवर

Windows 11 की रिलीज डेट से नए फीचर्स, डाउनलोड और रिक्वायरमेंट तक यहां जानिए सब कुछ

Kotak Mahindra Bank ने होम लोन किया और सस्ता

मारुति के Arena कार ग्राहकों को भी मिलेगा सुजुकी कनेक्ट फीचर, यह है इसकी खासियत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here