“वहां कौन था? काँग्रेस थी, भाजपा थी? रसोडे में मोदीजी थे”

सचिन सावंत यांचा ‘रसोडे में कौन था’च्या ओळींवरून व्यंगात्मक ट्विट

Congress spokesperson- Sachin sawant-critricised-modi-govt-after-gdp-collapse
Congress spokesperson- Sachin sawant-critricised-modi-govt-after-gdp-collapse

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील विकास दर (जीडीपी) उणे २३.९ टक्क्यांनी घसरला. जीडीपीची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारची पोलखोल झाली. अर्थव्यवस्थेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ‘रसोडे में कौन था’च्या ओळींवरून व्यंगात्मक ट्विट केलं आहे.

कोरोना कहर व लॉकडाउन आधीच घसरत चाललेला भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दरावरून काँग्रेसनंही सरकारवर टीका केली आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मोदी सरकार निर्लज्ज असल्याची टीका केली आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असलेल्या ‘रसोडे में कौन था’च्या ओळीतून मार्मिक टीका सावंत यांनी केल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. 

सचिन सावंत यांचा मार्मिक ट्विट

कल जनता की आँखो मे धूल झोकी थी और वो दुबारा सोने गयी थी।
तुम विकास का सपना दिखाकर जनता के पास आये ते तब रसोडे में कौन था
वहां कौन था?
काँग्रेस थी? भाजपा थी?
काँग्रेस थी? भाजपा थी?
कौन था?
कौन था?

कौन था?????

मोदीजी
(मोदीजी थे)…

७० साल का विकास निकाल दिये और भारत का जीडीपी डुबा दिया, जीडीपी डुबा दिया
डुबा दिया, हां डुबा दिया।
मोदीजी
(मोदीजी थे)…(मोदीजी थे)…

अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरी

३१ ऑगस्ट रोजी मागील तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून, एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here