Dear NCB, कंगनाला चौकशीसाठी कधी बोलावणार?

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा ड्रग्जबद्दल बोलतानाचा 'तो' व्हिडीओ केला ट्विट

congress-spokesperson- sachin-sawant-raised-questions-about-kangana-inquiry-in-drugs-case
congress-spokesperson- sachin-sawant-raised-questions-about-kangana-inquiry-in-drugs-case

मुंबई l आपण ड्रग्जच्या आहारी गेलो होतो, अशी कबूली देणारा अभिनेत्री कंगना रणौतचा Kangna ranaut व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. कंगना रणौत मुंबईत दाखल होताच काँग्रेसनं NCB ला प्रश्न विचारत चौकशीची आठवण करून दिली आहे. ड्रग्जच्या आहारी गेल्याची कबूली देतानाचा कंगनाचा व्हिडीओ काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस,प्रवक्ते सचिन सावंत Sachin sawant यांनी ट्विट केल्यानंतर सर्वांच्या नजरा NCB च्या कारवाईकडे लागल्या आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर राज्यात ड्रग्ज सेवन प्रकरणात काही कलाकारांची चौकशी झाली. सध्या काही कलाकारांची चौकशीही सुरु आहे. अभिनेत्री कंगना रणौत मंगळवारी मुंबईत दाखल झाली.

मुंबईत दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनसीबीला सवाल करणार ट्विट केलं आहे. ‘आपण ड्रग्जच्या आहारी गेलो होतो,’ अशी कबूली देणारा कंगनाचा व्हिडीओ ट्विट करत भाजपालाही लक्ष्य केलं. आहे.

डिअर एनसीबी, ती परत आलीये…

“डिअर एनसीबी, ती परत आलीये. या व्हिडीओच्या चौकशीसाठी तुम्ही कंगनाला कधी चौकशीसाठी बोलवणार आहात? कंगनाला बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची माहिती द्यायची असल्यानं मोदी सरकारने तिला वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे. मात्र, ती अजूनही माहिती लपवत आहे, जो की गुन्हा आहे,” असं सावंत यांनी म्हटलं आहे.

भाजपा महाराष्ट्राची माफी मागणार का?

“भाजपाने कंगनाला झांशीची राणी म्हटलं आहे आणि महाविकास आघाडी सरकार तिला ही माहिती पोलिसांना देऊ देत नाही, असा आरोपही केला आहे. NCBला माहिती देण्याची विनंती राम कदम आता कंगनाकडे करतील का? महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल भाजपा माफी मागणार का?,” असा सवालही सचिन सावंत यांनी केला आहे.

हेही वाचा : नए साल का जश्न पड़ेगा महंगा, जान ले नई गाइडलाइन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here