NEET/CBSE पेपरफुटीविरोधात काँग्रेसचा आज शनिवारी २५ जुलैला राज्यभर कँडलमार्च व सत्याग्रह.

Congress to hold a statewide candle march and *Satyagraha* today, Saturday, July 25, against the NEET/CBSE paper leaks
Congress to hold a statewide candle march and *Satyagraha* today, Saturday, July 25, against the NEET/CBSE paper leaks

मुंबईः देशभरात पेपरफुटीवरून NEET/CBSE paper leaks नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून लाखोंच्या संख्येने विद्यार्थी व पालक आंदोलनात सहभागी होत आहे. विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नावर काँग्रेस पक्षाने सर्वात आधी लढा देण्यास सुरुवात केलेली आहे. काँग्रेस पक्षाने आता हे आंदोलन गावोगावी पोहचवण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या शनिवार दिनांक २५ जुलै २६ रोजी प्रत्येक जिल्ह्यात कँडल मार्च candle march आणि सत्याग्रह आयोजित केला आहे.

NEET/CBSE परिक्षांच्या प्रश्नपत्रिका वारंवार फुटत आहेत. मागील १० वर्षात तब्बल १५२ वेळा पेपर लिक होऊनही मोदी सरकार त्याकडे लक्ष देत नाही. या निगरगट्ट सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला वेळ नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला तयार नाही. आपले हक्क मागणाऱ्या तरुण मुला-मुलींवर जागोजागी अमानुषपणे मारहाण केली जात आहे. या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार व प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून राज्यभर कँडल मार्च व सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावापरीक्षेत झालेल्या अनियमितता आणि  व्यवस्थात्मक अपयशांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहेत्यावर संसदेत तत्काळ चर्चा करावी आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले एफआयआर आणि गुन्हे त्वरित मागे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीगृहमंत्री अमित शाह यांनी युवकांची माफी मागावीया प्रमुख मागण्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here