पुणे : कोरोनावर प्रभावी लस Corona vaccine निर्मितीचे काम पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट Serum Institute of India मध्ये सुरू आहे. सीरममध्ये सुरू असलेल्या कोविशिल्ड लस Covishield vaccine निर्मिती प्रक्रियेतील प्रगती, तयारीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घेतली. पंतप्रधानांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर सीरमचे सीईओ अदर पुनावाला Ceo Adar poonawalla यांनी पत्रकार परिषद घेत अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे.
भारतात पहिल्यांदा लसीचं वितरण होणार
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये विकसित करण्यात येणारी कोरोनावरील कोविशिल्ड लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीच्या तिसऱ्या चाचणीकडे लक्ष आहे. लस विकसित झाल्यावर लसीचं वितरण पहिल्यांदा भारतात होणार अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे.
जुलै २०२१ प्रर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध
लस साठवणूक आणि कोल्ड स्टोरेजची पुरेशी व्यवस्था आहे. प्रत्येक महिन्याला ५ ते ६ कोटी डोसची निर्मिती सुरू आहे आणि जुलै २०२१ प्रर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली.
Adar Poonawalla Speaks About COVISHIELD – Live https://t.co/nN52Be0xIi
— SerumInstituteIndia (@SerumInstIndia) November 28, 2020
सर्वांना परवडणारी ही लसीची किंमत
कोविशिल्ड ही लस सर्वांना उपलब्ध करुन देण्यात येईल. नागरिकांपर्यंत लस पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. लसीची किंमत ही सर्वांना परवडणारी असेल असंही अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर महत्वपूर्ण चर्चा झाली
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीच्या उत्पादनाबद्दल संपूर्ण माहिती दिली
- लसीचं वितरण पहिल्यांदा भारतात होणार
- लसीच्या तिसऱ्या चाचणीकडे लक्ष आहे
- जुलै २०२१ प्रर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार
- प्रत्येक महिन्याला ५ ते ६ कोटी डोस निर्मिती सुरू
- कोविशिल्ड लसीमुळे ६० टक्के नागरिकांना रुग्णालयात उपचाराची गरज भासणार नाही
- कोविशिल्ड लस पूर्णपणे सुरक्षित आहे
- लस साठवणूक आणि कोल्ड स्टोरेजची पुरेशी व्यवस्था आहे
- लसीची किंमत ही सर्वांना परवडणारी असेल, ही लस सर्वांना उपलब्ध करुन देऊ
- नागरिकांपर्यंत लस पोहोचवण्याची तयारी सुरू आहे
हेही वाचा l पुढची चार वर्षे त्यांना त्याच पायरीवर आधार घेत थांबावे लागेल;शिवसेनेने भाजपाला डिवचले
[…] Covishield vaccine l PM मोदींच्या सीरम भेटीनंतर अदर … […]
[…] Covishield vaccine l PM मोदींच्या सीरम भेटीनंतर अदर … […]