Coronavirus Cases India l कोरोनाचा हाहाकार, देशात २४ तासांत ३ लाख ७९ हजार रुग्ण आढळले; ३६४५ मृत्यू

india-corona-update-286384-new-covid19-cases-found-and-573-deaths-in-24-hours-news
india-corona-update-286384-new-covid19-cases-found-and-573-deaths-in-24-hours-news

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गुरुवारी २४ तासांमध्ये तब्बल ३ लाख ७९ हजार २५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी असून ३६४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.Coronavirus-Cases-India-3-lakh-79-thousand-257-new-covid-19-cases-and-3645-deaths-in-last-24-hours –news-update

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ इतकी झाली आहे.

हेही वाचा : Parambir Singh l परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

गेल्या २४ तासांत २ लाख ६९ हजार ५०७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

देशात सध्याच्या घडीला ३० लाख८४ हजार ८१४ अॅक्टिव्ह रुग्ण असून १५ कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here