नागपुरात कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवशी ७९२ रुग्ण सापडले

maharashtra-49447-new-covid-cases-and-277-deaths-in-the-last-24-hour-news-updates
maharashtra-49447-new-covid-cases-and-277-deaths-in-the-last-24-hour-news-updates

नागपूर : विदर्भात कोरोना विषाणूचा Coronavirus कहर वाढत चालला आहे. नागपूर विभागात Nagpur division संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. एका दिवसात तब्बल ७९२ नवीन कोरोना रुगण सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

यामध्ये केवळ नागपूर Nagpur मध्ये ६४४ रुग्णांचा समावेश आहे. भंडारा Bhandara १९, चंद्रपूर Chandrapur १६, गोंदिया Gondia २, वर्धा Wardha १०४, गडचिरोली Gadchiroli ७ असे आहेत. यापैकी ३९९ रुग्ण बरे झाले असून नगपूर २५०, भंडारा ११, चंद्रपूर १२, गोंदिया ८, वर्धा ११६, गडचिरोली २ असे आहेत.

नागपूर विभागातील एकूण स्थिती

आजपर्यंत विभागात एकूण २ लाख १३ हजार १६४ कोरोना रुग्णांची संख्या असून, नागपूर १ लाख ४१ हजार २८ भंडारा १३ हजार ४३८, चंद्रपूर २३ हजार २९४, गोंदिया १४ हजार ४८४, वर्धा ११ हजार ६९६ आणि गडचिरोली ९ हजार २२४ असे आहेत. 

आतापर्यंत  विभागात बरे झालेले २ लाख १ हजार ६९४ असून, नागपूर १ लाख ३१ हजार ६७० भंडारा १२ हजार ९९२, चंद्रपूर २२ हजार ८२९, गोंदिया १४ हजार २२२, वर्धा १० हजार ८८३ आणि गडचिरोली ९ हजार ९८ असे आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या संदर्भातील स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे आढळून येत आहे. त्याअनुषंगाने १६ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

त्यानुसार, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करावी, असेही त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक सूचना

<<मास्कचा वापर अनिवार्य राहील अन्यथा दंडाची कार्यवाही करावी

<<सोशल डिस्टिसिंग पाळावे व सॅनिटायझरचा वापर करावा

<<लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर बंदी असून

<<लग्न समारंभात उपस्थित सर्व व्यक्तींनी मास्क परिधान करणे

<<सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे

<<नियमांचे पालन होत नसल्यास संबंधित जिल्हाधिकारी यांनी संबंधित हॉल, लॉन मालकास जबाबदार ठरवून हॉल किंवा लॉनचे लायसन्स रद्द करावे, व भारतीय दंड संहिताचे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत त्यांच्याविरुद्ध आवश्यक कारवाई करावी.

हेही वाचा

Petrol and diesel prices Today: इंधन दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोल 97 रुपये तर डिझेल 88 रुपये

Chhatrapati Shivaji Maharaj jayanti 2021:खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले संतापले;म्हणाले

किल्ले शिवनेरीवर अजित पवारांनी दिला ‘हा’ इशारा…

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here