कोरोनाचं थैमान! २४ तासांत ८०० रुग्णांचा मृत्यू

corona-covid-19-omicron-infection-patient-recovery-latest-updates-of-maharashtra-Friday-7-january-2022-news-update
corona-covid-19-omicron-infection-patient-recovery-latest-updates-of-maharashtra-Friday-7-january-2022-news-update

नवी दिल्ली l महाराष्ट्रासह देशातील कोरोनाचं थैमान सुरूच आहे. मागील २४ तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली असून, या आकडेवारीमुळे देशाची चिंता वाढली आहे. देशात २४ तासांत पहिल्यांदाच तब्बल दीड लाखांच्याजवळपास रुग्ण आढळून आले असून, ८०० रुग्णांना जीव गमावावा लागला आहे. coronavirus-india-sees-record-spike-of-1-lakh-45-thousand-fresh-covid19-cases-794-deaths-in-24-hours-news-update

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातला असून, प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे. गर्दी आणि कोरोना नियमाबद्दलची उदासिनता यामुळे दिवसेंदिवस रुग्णासंख्या नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गेल्या २४ तासांतील आकडेवारीतून हे स्पष्ट होत आहे.

देशभरात गेल्या २४ तासांत तब्बल एक लाख ४५ हजार ३८४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७७ हजार ५६७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे देशातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. २४ तासांत ७९४ म्हणजेच जवळपास ८०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ३२ लाख ५ हजार ९२६ इतकी झाली आहे.

India reports 1,45,384 new COVID19 cases, 77,567 discharges, and 794 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry

Total cases: 1,32,05,926
Total recoveries: 1,19,90,859
Active cases: 10,46,631
Death toll: 1,68,436

Total vaccination: 9,80,75,160 pic.twitter.com/ed39ltrY7W

— ANI (@ANI) April 10, 2021

महाराष्ट्रात तीनशेच्यावर कोरोना बळी

राज्यात शुक्रवारी महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढीचा आलेख कायम राहिला. दिवसभरात ५८ हजार ९९३ नवीन करोनाबाधित आढळून आले. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे दिवसभरात ३०१ रूग्णांचा मृत्यू झाला.

राज्यातील मृत्यू दर १.७४ टक्के इतका असून, आतापर्यंत राज्यात ५७ हजार ३२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण ५ लाख ३४ हजार ६०३ रूग्ण उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here