मोठी बातमी: देशात नव्या कोरोनाचे आतापर्यंत 25 रुग्ण आढळले

दिल्लीत चार रुग्ण आढळले, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली माहिती

coronavirus-new-strain-from-uk-four-positive-in-delhi-informs-health-minister-satyendra-jain-aap
coronavirus-new-strain-from-uk-four-positive-in-delhi-informs-health-minister-satyendra-jain-aap

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनामुळे coronavirus-new-strain जगसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. १६ देशात पोहोचलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा काही दिवसांपूर्वी भारतात शिरकाव झाला होता. दिल्लीतील चार रूग्णांच्या अहवालात व्हायरसच्या नव्या प्रकाराची लक्षणे आढळली आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन health-minister-satyendra-jain यांनी याबाबतची माहिती दिली. देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या आतापर्यंत 25वर पोहोचली आहे.

दिल्लीत नव्याने कोणत्याही प्रवाशाला प्रवेश बंदी 

दिल्लीत येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. आता दिल्लीत नव्याने कोणत्याही प्रवाशाला प्रवेश दिला जाणार नाही. जे लोक बाहेर गावाहून किंवा बाहेरच्या देशांतून दिल्लीत दाखल झाले आहेत, त्यांचा आम्ही मागोवा घेत आहोत”, अशी माहिती सत्येंद्र जैन यांनी दिली.

२५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून आलेले ११४ प्रवासी पॉझिटिव्ह

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला. या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली. तरीही नव्या करोनानं भारतात पाऊल ठेवलं. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून ३३ हजार नागरिक भारतात परतले.

आतापर्यंत 114 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे  नमुने प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. यात बंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यापैकी तीन रुग्णांमध्ये नवीन प्रकार आढळून आला.

यात नव्याने चार रूग्णांची भर 

हैदराबाद प्रयोगशाळेतील दोघांच्या शरीरात आणि पुण्यातील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एका नमुन्यात हा स्ट्रेन आढळला. त्यामुळे एकूण सहा रुग्णांच्या शरीरात कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याची माहिती होती. त्यानंतर आता यात नव्याने चार रूग्णांची भर पडली आहे.

हेही वाचा :  Baby bump सह फॅशन मॅगझिनवर झळकली अनुष्का शर्मा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here