COVID 19 : राज्यात शनिवारी ९ हजार १७० नवीन कोरोनाबाधित आढळले ; मुंबईत सहा हजार रूग्णांची नोंद!

fourth-wave-of-coronavirus-who-omicron-variant-vaccination-news-update-today
fourth-wave-of-coronavirus-who-omicron-variant-vaccination-news-update-today

मुंबई: राज्यातील कोरोना झपाट्याने वाढत चालला आहे. दररोज आढळणाऱ्या रूग्णांची संख्या ही मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे. ओमायक्रॉनचे रूग्ण देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कडक पावलं उचलली जात असून, निर्बंध अधिक कठोर केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात ९ हजार १७० नवीन कोरोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे. तर, मुंबईत ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधितांची आज नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात आज सात कोरोनाबाधित रूग्णांचा तर मुंबईत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

तर, आज शनिवारी राज्यात १ हजार ४४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१०,५४१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिक्व्हरी रेट ) ९७.३५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात शनिवारी एकूण ३२,२२५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,८७,९९१ झाली आहे. आजपर्यंत राज्या १४१५३३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

हेही वाचा: Delhi Corona Update: दिल्ली में कोरोना संक्रमण ने तोड़ा 7 महीने का रिकॉर्ड, 24 घंटों में 2716 केस दर्ज

 राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९१,३६,६४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,८७,९९१ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२६,००१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत आज ४५१ रूग्ण कोरोनामुक्त झाले, सध्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या २२ हजार ३३४ आहे. तर, एकूण ७५०१५८ जण आतापर्यंत बरे झाले आहेत. काल मुंबईत ५ हजार ६३१ कोरोनाबाधित आढळले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here