गुजरातमध्ये कोविड रुग्णांवर गोमूत्र व दूधाच्या मदतीने उपचार

covid-crisis-in-gujrat-covid-centre-inside-gaushala-treats-patients-with-drugs-from-cow-milk-and-urine-news-update
covid-crisis-in-gujrat-covid-centre-inside-gaushala-treats-patients-with-drugs-from-cow-milk-and-urine-news-update

मुंबई: गुजरातमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे गुजरातमध्ये आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्यातील परिस्थिती चव्हाट्यावर आली होती. गुजरातमधील परिस्थिती अद्यापही बिकट आहे. अशातच राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील तेतोडा गावात गोशाळेचं रुपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. येथील रुग्णांवर गाईच्या दूध आणि गोमूत्रापासून बनवण्यात आलेल्या औषधांच्या मदतीने उपचार केले जात आहेत.

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील तेतोडा गावात सुरू करण्यात आलेल्या या कोविड सेंटरचं नाव ‘वेदालक्षण पंचगव्य आयुर्वेद कोविड आयसोलेशन सेंटर’ असं आहे. ५ मे रोजी हे कोविड सेंटर सुरू करण्यात आलं. येथे सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात.

“या कोविड सेंटरमध्ये सौम्य लक्षणं असलेल्या करोना रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. करोनाचं संक्रमण झालेल्या रुग्णाला आठ प्रकारच्या औषधी दिल्या जातात. या औषधी गाईचं दूध, तूप आणि गोमूत्रापासून तयार केलेल्या आहेत. पंचगव्य आयुर्वदिक पद्धतीने इथे करोना रुग्णांवर उपचार केले जातात. कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना गो तीर्थ दिलं जातं. जे गोमूत्र आणि इतर वनस्पतींपासून बनवलेलं आहे. त्याचबरोबर रुग्णांना प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही औषधी दिली जाते, जी गाईच्या दूधापासून तयार केलेली आहे,” असं जाधव यांनी सांगितलं.

हेही वाचा: …आता भारतीय जनता पक्षाची गोबेल्स यंत्रणा काय बोलणार आहे?: शिवसेना

“गोशाळा कोविड सेंटरमध्ये दोन आयुर्वेदिक डॉक्टरांनाही नियुक्त करण्यात आलेलं आहे. हे डॉक्टर करोनाबाधित रुग्णांवर उपचार करतात. रुग्णांना गरज भासल्यास अॅलोपॅथिक औषधीही दिल्या जातात. त्यासाठीही दोन एमबीबीएसपर्यंत शिक्षण झालेले डॉक्टर नियुक्त करण्यात आलेले आहेत,” असंही जाधव म्हणाले. या कोविड सेंटरविषयी बोलताना बनासकांठाचे जिल्हाधिकारी आनंद पटेल म्हणाले,”कोविड केअर सेंटर चालविण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. गोशाळेत सुरू असलेल्या कोविड सेंटरबद्दल माहिती देण्यात आली होती आणि त्याला परवानगीही देण्यात आलेली आहे,” अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here