मुंबईत नाईट क्लबवर छापा; सुरैश रैना, सुझान खानसहित ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल

cricketer-suresh-raina-singer-guru-randhawa- sussanne khan-booked-in-raid-at-mumbai-club
cricketer-suresh-raina-singer-guru-randhawa- sussanne khan-booked-in-raid-at-mumbai-club-

मुंबई l मुंबई विमानतळावजवळील mumbai airport ड्रॅगनफ्लाय क्लबवर Dragonfly club mumbai पोलिसांनी छापा टाकला. या क्लबमध्ये सुरेश रैनासोबत, गायक गुरु रंधावा, सुझेन खान तसंच इतर काही सेलिब्रेटींवसह एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहार पोलिसांकडून मध्यरात्री २.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.

क्रिकेटपटू सुरेश रैनासह 27 सेलेब्रिटीज आणि 7 स्टाफ मेंबर्स विरोधात IPC च्या 188, 269 आणि 34 कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी क्लबमध्ये अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होते. राज्यात सध्या लॉकडाउनचे नियम जारी आहेत. यानुसार रात्री 11 वाजेनंतर कोणत्याही प्रकारची पार्टी किंवा सार्वजनिक आयोजनावर बंदी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेडब्ल्यू मॅरियट स्थित ड्रॅगन फ्लाय क्लबवर डीसीपी जैन, पीआय यादव (गोडवी पोलिस स्टेशन) यांच्या पथकाने छापा टाकला. या पार्टीत 19 लोक दिल्लीहून आले होते. इतर लोक पंजाब आणि दक्षिण मुंबईतील रहिवासी होते. यातील बहुतांश लोक नशेत होते.

मुंबई पोलिसांनी एएनआयशी बोलताना माहिती दिली. मुंबई पोलिसांकडून क्लबच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान काही जण मागील दरवाजातून पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संचारबंदीच्या निर्णयामुळे सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध आले आहेत. नाताळच्या उत्साहावरही विरजण पडणार आहे.

माहितीनुसार, या छापेमारी दरम्यान क्रिकेटपटू सुरेश रैना, गायक गुरु रंधावा, सुजैन खान येथे उपस्थित होते. पोलिस सूत्रांनी सांगितले, छापेमारी दरम्यान एक मोठा गायक क्लबच्या मागील गेटने फरार झाला. यामध्ये बादशाहचे नाव समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here