बापरे! ठाण्यात सूरज वॉटर पार्कमध्ये आढळली 7 फूट लांब मगर

crocodile-spotted-in-suraj-water-park-rescued-in-thane-news-update
crocodile-spotted-in-suraj-water-park-rescued-in-thane-news-update

ठाणे l ठाण्याच्या (Thane) सूरज वॉटर पार्कमध्ये (Suraj water park) एक-दोन नव्हे तर तब्बल सात फूट सांब मगर (Crocodile) आढळली आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची एकच पाचावर धारण बसली. कोरोना काळात वॉटर पार्क बंद होता. त्याचवेळी जंगलातून ही मगर वॉटर पार्कमध्ये आली असावी, अशी माहिती समोर येत आहे. 

वॉटर पार्कची पाहणी करत असताना पार्कच्या कर्मचाऱ्यांना वॉटर पार्कमध्ये ही मगर दिसली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पाचावरण धारणच बसली. संजय गांधी राष्ट्रीय उद्याना नजीक असलेल्या या वॉटर पार्कमध्ये मगर आढळून आल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी ‘रॉ’ या वन्यजीव संघटनेच्या स्वयंसेवकांना याबाबत माहिती दिली.

संस्थेच्या लोकांनी सूरज वॉटर पार्क येथे धाव घेत मगरीला सुखरूपपणे बाहेर काढले. त्यानंतर ठाणे वनविभागाचे रेंज ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली उपचारानंतर मगरीला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मात्र ठाणे शहराच्या एका प्रसिध्द वॉटर पार्कमध्ये इतकी मोठी मगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मगरीच्या पिल्लांची तस्करी

दरम्यान, 13 जुलै 2021 रोजी मगरीच्या जिवंत पिल्लांची तस्करी करणाऱ्या आरोपीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. साकलेन सिराजुद्दीन खातीब असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. तो ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागातील रहिवासी आहे. त्याच्या ताब्यातून क्रोकोडियस पॅलेस्ट्रीयस (Crocodylus Palustris) जातीचे दुर्मिळ अशी मगरीची सात जिवंत पिल्लं हस्तगत करण्यात आली होती.

या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मगरीच्या पिल्लांची विक्री करण्यासाठी एक जण मुंब्रा भागात येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकास मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 10 जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुंब्रा बायपास येथील रेतीबंदर ब्रिजखाली सापळा लावला. यावेळी एक व्यक्ती प्लास्टिक बॅग घेऊन संशयास्पदरित्या घटनास्थळी आढळून आला.

पिंजऱ्यासारखी प्लॅस्टिक बॅग

पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळील बॅगेत तब्बल 7 जिवंत मगरीची पिल्ले आढळून आली. या पिल्लांना ठेवण्यासाठी तस्कराने खास पिंजऱ्यासारखी प्लॅस्टिक बॅग बनवली होती. ही सर्व मगरीची क्रोकोडियस पॅलेस्ट्रीयस या दुर्मिळ जातीची पिल्ले होती.

एकूण किंमत 2 लाख 80 हजार रुपये

पोलिसांनी या पिल्लांची सुटका करून त्यांना वन विभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीने ही पिल्ले प्रत्येकी 40 हजार रुपये किमतीत विक्रीसाठी आणली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. या मगर जातीच्या पिल्लांची एकूण किंमत 2 लाख 80 हजार रुपये इतकी होती. अटकेतील आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. 

हेही वाचा

राज्यपाल महोदय 12 सदस्यांची नावे मंजूरही करत नाहीत, त्यावर बोलायलाही ते तयार नाहीत!

Weather Updates: मध्य प्रदेश-गुजरात सहित दक्षिण के इन राज्यों में अगले पांच दिनों तक बारिश का अलर्ट, मौसम के ताजा अपडेट

Realme लाया नया गेमिंग स्मार्टफोन, ये है कीमत

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here