CTET answer key 2021 l सीटीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका प्रसिद्ध, या लिंकवरुन करा डाऊनलोड

dled-ctet-exam-same-time-demand-to-postpone-dled-exam-news-update-today
dled-ctet-exam-same-time-demand-to-postpone-dled-exam-news-update-today

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी CTET ची उत्तरपत्रिका जाहीर झाली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CBSE शुक्रवारी सीटीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका आपली अधिकृत वेबसाईट ctet.nic.in वर शुक्रवारी जाहीर केली.

परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत पोर्टलवर आवश्यक तपशील प्रविष्ट केल्यानंतर उत्तर तपासू शकतात. याशिवाय आपण खाली दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून किंवा थेट लिंकद्वारे उत्तरे तपासू शकता. सीबीएसई बोर्डाने 31 जानेवारी 2021 रोजी सीटीईटी परीक्षा आयोजित केली होती.

सीटीईटी परीक्षेची उत्तरपत्रिका चेक करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ctet.nic.in वर जा. त्यानंतर होमपेजवर CTET जानेवारी 2021 साठी चॅलेंज असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर लिंकवरील एक पर्याय निवडा.

डिस्प्ले स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. आपल्या क्रेडेन्शिअल्स आणि लॉगिनवरुन एन्टर करा. एन्टर केल्यानंतर सीटीईटी उत्तरपत्रिका 2021 स्क्रीनवर प्रदर्शित होईल. डाउनलोड करुन प्रिंट काढा.

हरकत नोंदवण्यास 21 फेब्रुवारीपर्यंत मुदत

उमेदवारांनी नोंद घ्यावी की सीबीएसई बोर्डाने 19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2021 पर्यंत उत्तरपत्रिकेच्या विरोधात हरकत नोंदवण्यास उमेदवारांना वेळ दिला आहे. यावेळी एखाद्या उमेदवाराला असे वाटले की त्यांचे उत्तर चुकीचे तपासले गेले आहे, तर ते यासाठी आक्षेप नोंदवू शकतात. यासाठी त्यांना अधिकृत पोर्टलवर नमूद केलेल्या सुचनांचे अनुसरण करावे लागेल.

त्याचबरोबर उमेदवारांना प्रत्येक प्रश्नासाठी 1000 रुपये शुल्क द्यावे लागेल. फीचे भुगतान क्रेडिट / डेबिट कार्डद्वारे सादर केले जाईल. एकदा भरलेले शुल्क परत मिळणार नाही. याशिवाय परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

हेही वाचा

उद्धव ठाकरेंचं अजित पवारांबद्दल मोठं विधान; म्हणाले…

नागपुरात कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवशी ७९२ रुग्ण सापडले

Petrol and diesel prices Today: इंधन दरवाढीचा भडका; मुंबईत पेट्रोल 97 रुपये तर डिझेल 88 रुपये

Chhatrapati Shivaji Maharaj jayanti 2021:खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले संतापले;म्हणाले

किल्ले शिवनेरीवर अजित पवारांनी दिला ‘हा’ इशारा…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here