सावध व्हा! दिवाळीच्या ऑनलाइन खरेदीवर सायबर भामटयांचा डोळा!

सायबर भामटे अधिक सक्रिय असतात. ते ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची फसणवूक करत असतात. अशा अनेक घटना वाढल्या असल्याने पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

cyber-hackers-keep-an-eye-on-diwali-online-shopping-news-update
cyber-hackers-keep-an-eye-on-diwali-online-shopping-news-update

मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने जोरदार शॉपिंग (Diwali online shopping) धमाका सुरु आहे. मोठय़ा प्रमाणावर ऑनलाइन खरेदी (0nline Shopping) होत असून त्यामुळे सायबर भामटे सक्रिय झाले आहेत. ऑनलाइन खरेदी करणाऱ्या नागरिकांची विविध प्रकारे फसवणूक केली जात आहे. अ‍ॅमेझॉन भाग्यवान स्पर्धेत १० लाखांचे बक्षीस जिंकल्याचे सांगून फसवणूक करण्यात आली आहे. सायबर भामटे सक्रिय झाल्याने नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन मुंबई सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दिवाळीनिमित्त भारतात मोठय़ा प्रमाणात वस्तूंची खरेदी-विक्री होते. सध्या डिजिटल युगात ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा कल असतो. घरबसल्या लोक खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवरून हवी ती वस्तू मागवत आहेत. त्यातच फोनवरून पैसे भरण्याची सुविधा, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड या सुविधांमुळे ऑनलाइन खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात सायबर भामटे अधिक सक्रिय असतात. ते ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची फसणवूक करत असतात. अशा अनेक घटना वाढल्या असल्याने पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

फसवणूक करण्यासाठी सायबर भामटे दरवेळी नवनवीन पद्धतीने फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी अ‍ॅमेझॉन ऑनलाइन शॉिपग भाग्यवान विजेते स्पर्धेच्या नावाखाली कूपन खोडून एक लाख ते १० लाख रुपये जिंकल्याचा बनाव करत आहेत. पुढे ती रक्कम मिळवण्याच्या नावाखाली मोबाइल क्रमांकवर नोंदणीकरण शुल्क, इतर शुल्कांच्या माध्यमांतून पैसे घेऊन फसवणूक करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे कूपन प्राप्त झाल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच भाग्यवान स्पर्धेच्या नावाखाली सायबर भामटय़ांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ऑनलाईन खरेदीपूर्वी घ्या काळजी…
ऑनलाईन खरेदी करतानाही नागरिकांनी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. ऑनलाईन मागविलेले पार्सल मिळाल्यानंतर त्यावर नोंद असलेली वस्तू आणि मागवलेली वस्तू सारख्या आहेत का, हे तपासून पाहिले पाहिजे.
पार्सल उघडताना व्यवस्थित जागी ठेवून त्याचा व्हिडीओ बनवला पाहिजे. व्हिडीओ बनवताना त्यात सर्व रेकॉर्ड होईल हेही पाहावे. जेणेकरून फसगत झाल्यास संबंधितांकडे बनविलेला व्हिडीओ पाठवून दाद मागता येऊ शकते.
पाहा काय कराल?
1.ओटीपी क्रमांक कोणालाही सांगू नका.
2.ऑनलाइन संकेतस्थळांवर माहिती देताना काळजी घ्या.
3.थोडा कठीण पासवर्ड ठेवा.
4.पासवर्ड ठेवताना स्टार, हॅश सारख्या ‘की’चा वापर करा.
5.भाग्यवान स्पर्धेच्या आमिषाला बळी पडू नका.
6.पासवर्ड ठरावीक वेळेने बदलत राहा.
7.नेहमी सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करावा. * अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here