आज २६ ऑक्टोबर, मंगळवारी, चंद्र दिवसभर मिथुन राशीत राहील. पंचांगांच्या गणनेनुसार, आज अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची पंचमी तिथी सकाळी ८ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहील आणि त्यानंतर षष्ठी तिथी सुरू होईल. आज राहू आणि बुध ग्रहाचा प्रभाव असलेल्या आद्रा नक्षत्राचा प्रभाव असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, जाणून घ्या…
मेष
या राशीची माणसे जी तांत्रिक क्षेत्रांना सेवा पुरवतात त्यांना चांगले परिणाम मिळतील. मात्र, चंद्र तिसऱ्या स्थानी असल्यामुळे तुम्हाला घशाशी संबंधित समस्या असू शकतात, त्यामुळे जास्त थंड वस्तू खाणे टाळा. प्रभाव वाढू शकतो, धैर्याचा फायदा होऊ शकतो.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना आता आर्थिक बाबींमध्ये फायदा होऊ शकतो. वडिलांकडून वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यताही आहे. दुसऱ्या स्थानी चंद्राच्या उपस्थितीमुळे तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. अनावश्यक खर्च आज कमी होतील, पैसे वाचवण्यावर भर असेल. बोलण्याच्या कलेने तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल.
मिथुन
तुमच्या लग्न स्थानात चंद्राच्या उपस्थितीमुळे तुमच्या स्वभावात नम्रता दिसून येईल. आज, तुमच्या विवेकबुद्धीच्या बळावर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगले परिणाम मिळवू शकता. जर काही कारणास्तव तुम्हाला बराच काळ त्रास होत असेल तर आज तुम्हाला त्या समस्येचे समाधान मिळू शकते.
कर्क
आज तुमच्या खर्चाच्या स्थानी चंद्राच्या उपस्थितीमुळे तुम्हाला आर्थिक संबंधित बाबींमध्ये सावध राहावे लागेल. जर तुम्ही व्यवहार करणार असाल तर तुमच्या आजूबाजूला विश्वासू व्यक्ती ठेवा. आज तुम्ही जास्त चिंता कराल आणि झोपही कमी येईल. काही लोकांना इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो.
सिंह
तुमच्या अकराव्या स्थानी विराजमान असलेला चंद्र आज तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो. या राशीच्या लोकांना त्या कामात लाभ होईल जे ते बऱ्याच काळापासून करत आहेत. गुंतवणुकीच्या बाबतीतही या राशीच्या लोकांना आज लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
कन्या
आज कन्या राशीची लोकं जी राजकारणामध्ये किंवा सरकारी क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी चांगला दिवस आहे. या दिवशी कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. व्यवसायात प्रगती होईल. प्रतिष्ठेचा लाभ देखील तुम्ही मिळवू शकता.
तूळ
आज तूळ राशीच्या लोकांमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक भावनेचा वावर असेल. नशीब तुम्हाला कमी प्रयत्नात अनेक कार्यांमध्ये यशस्वी करेल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस विशेष असेल. विद्यार्थी देखील आज त्यांच्या कामगिरीने आनंदी असतील. तुमचे घर देखील आज चांगले असेल.
वृश्चिक
या लोकांना आज त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी घ्यावी लागेल, तसेच वाहन चालवताना अत्यंत काळजीपूर्वक चालवावे लागेल. मन शांत ठेवण्यासाठी या राशीच्या लोकांनी आज योग ध्यान करावे. आज धोकादायक कामात हात घालणे टाळा.
धनू
व्यापारी आज चांगला नफा मिळवू शकतात. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एक प्रकारची चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात सुखद अनुभूती येईल. रेशन आणि रिटेल व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असू शकतो.
मकर
या राशीची जी माणसे कायद्याच्या कचाट्यात सापडली आहेत त्यांना काळजी घ्यावी लागेल. आज तुमच्या भावनांवर शक्य तितके नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. विरोधक आज सक्रीय होतील, त्यांच्यापासून सावध राहा. असे कोणतेही काम करू नका जेणेकरून प्रकरण तुमच्या सन्मानापर्यंत पोहोचेल.
कुंभ
कुंभ राशीचे लोकं कुटुंबात मंगल कार्याचे आयोजन करू शकता. घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असू शकते. प्रेमात असलेल्या या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवसही चांगला असेल. तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
मीन
चंद्र आज तुमच्या सुख भावनेत असेल, मग ते कौटुंबिक जीवन असो किंवा सामाजिक, तुम्हाला सर्वत्र सकारात्मक बदल पाहायला मिळतील. ज्यांना मालमत्ता जमीन खरेदी करायची होती, त्यांच्या इच्छा आज पूर्ण होऊ शकतात. आईकडून आनंद मिळेल. या राशीचे लोक जे वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची इच्छाही आज पूर्ण होऊ शकते.
–