दीपिका पदुकोण NCB कार्यालयात, चौकशी सुरु; सारा, श्रद्धाचीही होणार चौकशी!

deepika-padukone-at-ncb-sit-office
दीपिका पदुकोणची NCB कडून चौकशी deepika-padukone-at-ncb-sit-office

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika-padukone) चौकशीसाठी नार्कोटेस्ट कंट्रोल ब्यूरो (NCB) कार्यालयात दाखल झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री दीपिकाचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज नार्कोटेस्ट कंट्रोल ब्यूरो (NCB) दीपिकाची चौकशी करत आहे.

नार्कोटेस्ट कंट्रोल ब्यूरो (NCB)ने बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, आज शनिवारी (२६ सप्टेंबर) दीपिका पदुकोणची चौकशी सुरु झाली आहे. काल शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रकुल प्रीत सिंह आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची चौकशी करण्यात आली.

वाचा सविस्तर – काय आहे संपूर्ण प्रकरण येथे क्लिक CLICK करा

सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान सारा, रकुल यांचा उल्लेख केला होता. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत (NCB) पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली, तर बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारकांशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीनंतर NCB ने दीपिकाला समन्स जारी केले होते.

 वाचा – दीपिका पदुकोणच्या चॅट ड्रग बद्दल वाचा सविस्तर क्लिक click करा 

आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या दीपिकाची चौकशी सुरु असून तिला अडचण येणार नाही अशी माहिती ज्येष्ठ विधीतज्ञांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here