Delhi Darbar : ‘दिल्ली दरबार’चे संस्थापक जाफर भाई यांचे कोरोनामुळे निधन

जाफर भाईंची ‘बिर्याणी किंग ऑफ मुंबई’ या नावाने ओळख

delhi-darbar -owner-jaffer-gulam-mansuri-passes-away
delhi-darbar -owner-jaffer-gulam-mansuri-passes-away

मुंबई : दिल्ली दरबार या लोकप्रिय हॉटेलचे मालक जाफर गुलाम मन्सुरी यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जाफर भाईंना ‘बिर्याणी किंग ऑफ मुंबई’ या नावाने ओळखलं जायचं. जाफर हे खवय्यांमध्ये जाफर भाई नावाने लोकप्रिय होते. मुंबईमध्ये मोगलाई पदार्थ मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण म्हणून दिल्ली दरबारला खवय्यांची कायमच पसंती मिळालेली आहे.

जाफर भाई यांना २ सप्टेंबरपासून करोनाचा संसर्ग झाल्या होता तेव्हांपासून त्यांना मुंबईथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलेलं. येथेच उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचे निधन झाले. मरिन लाइन्सजवळील बाबा कब्रिस्तानमध्ये त्यांचा दफनविधी पार पडला.

 ‘जाफर भाईज दिल्ली दरबार’ ही स्वतंत्र फूडचेन

जाफर भाई मूळचे अहमदाबादचे. जाफर भाई यांनी १९७३ साली दिल्ली दरबारची स्थापना केली. २००६ साली त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायातून काढता पाय घेत स्वत:ची ‘जाफर भाईज दिल्ली दरबार’ ही स्वतंत्र फूडचेन सुरु केली. तरुण वयातच जाफर भाईंनी खाद्यपदार्थांसंदर्भातील व्यवसायामध्ये काम करण्यास सुरुवात केली. वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांना परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर त्यांना वडिलोपार्जित कॅटरिंगच्या व्यवसायात लक्ष घातलं होतं.

मुंबईतील ग्रँट रोड येथे १९७३ साली दिल्ली दरबारची पहिली शाखा सुरु

मुंबईतील ग्रँट रोड येथे १९७३ साली त्यांनी दिल्ली दरबारची पहिली शाखा सुरु केली. स्वत: मालक असूनही हॉटेलच्या रोजच्या लहान लहान कामांमध्ये जातीने लक्ष घालायचे आणि अनेक गोष्टी त्यांनी स्वत: शिकून घेतल्या होत्या. त्यांच्या या बिर्याणीला मुंबईकरांचा चांगला प्रिसाद मिळाला. अनेक ठिकाणी दिल्ली दरबारच्या फ्रॅन्चायजीखाली हॉटेल सुरु केली. भारतातील अनेक शहरांपासून ते दुबईपर्यंत दिल्ली दरबारचा व्यवसाय पसरला आहे.

विशेष म्हणजे मोगलाई पदार्थांबरोबरच बिर्याणीसाठी दिल्ली दराबर ओळखले जाते. याच चवीसाठी वेगवेगळ्या पुरस्कारांनी दिल्ली दरबारचा गौरव मागील अनेक वर्षांमध्ये झाला आहे. दिल्ली दरबारची एक वेगळी ओळख कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here