मुंबई: निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने ठाकऱ्यांची शिवसेना शिंद्यांची झाली. त्या शिवसेनेचा पसारा डोक्यावर घेऊन श्रीमान शिंदे किती तग धरणार? शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण गेल्या ५० वर्षांपासून आहे. ते जगाला समजले आहे मात्र निवडणूक आयोगाला समजले नाही. निवडणूक आयोगाने डोळे मिटून शिवसेना हे नाव, चिन्ह, धनुष्यबाण हे फुटीर शिंदे गटाला दिले. तरीही त्यांना कुणी शिवसेना मानायला तयार नाही असंही म्हणत खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या आपल्या सदरातून निवडणूक आयोगावर आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर टीका केली आहे.
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये?
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दाद मागण्यासाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात पोहचली. खरी शिवसेना आमचीच हे सर्वोच्च न्यायालयात ठाकरे यांना सिद्ध करावे लागते हे महाराष्ट्राचे आणि न्याय व्यवस्थेचे दुर्दैव आहे. शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह मिळावं म्हणून एकनाथ शिंदे यांनी २ हजार कोटी मोजले आहेत असा आरोप संजय राऊत यांनी आधीच केला आहे. त्यानंतर आजच्या रोखठोक या सदरात त्यांनी शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे.