Sulli Deal App: सुल्ली डील अ‍ॅपच्या आरोपीला बेड्या, मुस्लिम महिला टार्गेटवर

औरंगाबादच्या विधीतज्ञ अस्मा शेख यांनी पीडित महिलांसाठी उभारला लढा

delhi-police-arrest-of-main-accused-omkareshwar-thakur-sulli-deal-app-case-news-update
delhi-police-arrest-of-main-accused-omkareshwar-thakur-sulli-deal-app-case-news-update

नवी दिल्ली: बुली बाई अ‍ॅप (Bulli bai App) प्रकरणानंतर आता सुल्ली डील अ‍ॅप (Sulli Deal App) प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सुल्ली डील अ‍ॅप प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत मध्य प्रदेशच्या इंदौरमधून सुल्ली डील अ‍ॅपच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचं नाव ओमकेश्वर ठाकुर (Omkareshwar Thakur) असं आहे. तो BCA चा विद्यार्थी आहे. मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये सुल्ली डील अ‍ॅप तयार करण्यात आला होता. यामध्ये मुस्लिम महिलांना टार्गेट केलं जात होतं.

मुख्य आरोपीचा मोठा खुलासा
सुल्ली डील अ‍ॅप प्रकरणात या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे. ज्यामध्ये त्यांनाही अनेक भूमिका साकारल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अजून दोन आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. बुली बाई अ‍ॅप क्रिएट करणारा मुख्य आरोपी नीरज बिश्नोई ७ दिवसांसाठी स्पेशल सेलच्या IFSO युटीनच्या कस्टडीमध्ये आहे. पोलिसांनी सुल्ली डील अ‍ॅपच्या मुख्य आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी केली जात आहे.

सुल्ली डील प्रकरणी पोलिसांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये एफआयआर दाखल केला होता. सुल्ली डीलला गिटहबवर लॉन्च करण्यात आलं होतं. यावर मुस्लिम महिलांची ऑनलाईन बोली लावण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत नीरजने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. सुल्ली डील प्रकरणात एक ट्विटर हँडल तयार करण्यात आले होते. त्यावरून सुल्ली डीलच्या निर्मात्यांशी संपर्क साधला जात होता.

नीरज बिष्णोईला आसाममधून अटक
दरम्यान, बुली बाई अ‍ॅपचा मुख्य आरोपी नीरज बिष्णोईला आसाममधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. यावेळी तो पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

औरंगाबादेत अस्मा शेख यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल

औरंगाबादच्या सुप्रसिध्द विधीतज्ञ अस्मा शेख यांनी सुल्ली डील प्रकरणात 13 जुलै 2021 रोजी अजित भारतीच्या विरोधात तक्रार दिली होती. भारती विरुध्द 5 जानेवारी 2022 मध्ये छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला. भारती याने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून सुल्ली डील अॅपची लिंक शेअर केली होती. आरोपी भारतीवर अद्यापही कारवाई झाली नाही.

पीडित महिलांनी संपर्क करण्याच आवाहन
कोणत्याही समाजाच्या महिलांची अशा प्रकारे बदनामी केली जात असले तर त्याच्याविरुध्द लढा उभा करणार असल्याचे अॅड. अस्मा शेख यांनी सांगितले. ज्या पीडित महिला असतील त्यांनी संपर्क करावा असेही आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here