मुंबई l महाराष्ट्रामध्ये डेल्टा प्लसच्या Delta Plus रुग्णांची वाढ होत आहे. राज्यात डेल्टा प्लस बाधित रुग्णांची संख्या 66 वर गेली असून आतापर्यंत 5 डेल्टा प्लस बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी दिली आहे. दरम्यान बाधित एकूण 66 रुग्णांपैकी 10 जणांनी कोविड प्रतिबंधक दोन्ही डोस घेतले असून 8 जणांनी एक डोस घेतल्याची देखील माहिती टोपे यांनी दिली आहे. आजवर राज्यात डेल्टा प्लस बाधित 5 जणांचा मृत्यू झाला असून त्यांना इतर आजार असल्याचं देखील टोपे यांनी सांगितलं आहे.
डेल्टाची रुग्ण संख्या
मुंबई-11
जळगाव -13
रत्नागिरी -12
ठाणे- 06
पुणे-06
रायगड-03
पालघर-03
नांदेड–02
गोंदिया-02
चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड याठिकाणी डेल्टाचा प्रत्येकी एक रुग्ण
महाराष्ट्रात शुक्रवारी 158 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
महाराष्ट्रात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल 6,686 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 80 हजार 871 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85टक्के आहे. महाराष्ट्रात काल 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 62 हजार 351 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (1), परभणी ”(40), हिंगोली (81), नांदेड (51), अमरावती (57), अकोला (37), वाशिम (21), बुलढाणा (6), यवतमाळ (16), वर्धा (5), भंडारा (1), गोंदिया (3), चंद्रपूर (83), गडचिरोली (25) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 522 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.