मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाणांना लाज वाटायला हवी : सुनिल केदार

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद पेटला

Deora, Wasnik, Prithviraj Chavan should be ashamed: Sunil Kedar
Deora, Wasnik, Prithviraj Chavan should be ashamed: Sunil Kedar

मुंबई : नेतृत्वाच्या मुद्यावरून काँग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे. यात काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री सुनिल केदार यांनी थेट पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्यावर उघडपणे टीकेची झोड उठवली आहे. गांधी कुटुंबियांवर प्रश्न उपस्थित करणा-या या नेत्यांना लाज वाटायला हवी, अशी बोचरी टीका केदार यांनी केली आहे.

देशातील कॉंग्रेसच्या विद्यमान खासदार आणि माजी मंत्र्यांच्या एका गटाने काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्वाची मागणी केली आहे. तर आणखी एका गटाकडून राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाचे अध्यक्ष करण्याची मागणी करण्यात येत आहे. काही माजी मंत्र्यांसह अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनेत मोठा बदल करण्याची मागणी केली आहे, तर राहुल गांधी यांच्या जवळच्या काही नेत्यांनी सीडब्ल्यूसीला पक्षाच्या अध्यक्षपदावर परत येण्यासाठी पत्र लिहिले आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून पक्ष सध्या दोन गटांत विभागला गेला आहे.

यातच काँग्रेस नेतृत्वात बदलाच्या मागणीसाठी २३ नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठविले होते. यात महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा या तीन नेत्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर केदार यांनी, गांधी कुटुंबियांवर प्रश्न उपस्थित करणा-यांना पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी या कृत्याबद्दल तात्काळ माफी मागावी, अशी मागणी ट्विटरद्वारे केली आहे. माफी मागितली नाही तर हे तीन नेते राज्यात कसे फिरतात ते काँग्रेसचे कार्यकर्ते बघून घेतील. गांधी घराण्याचे नेतृत्व असेल तरच काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकतो. सोनिया गांधी यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे, असेही सुनिल केदार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here