नवी दिल्ली: राज्यात दहा वर्षात 3 कोटी ५८ लाख नागरिकांनी जनधन jan dhan yojana खाते उघडले. त्या खात्यामध्ये १४ हजार ७२९ कोटीच्या ठेवी आहेत. तर ३१ लाख खात्यात झीरो बॅलेन्स आहे. मराठवाड्यात ८३ लाख ५२ हजार खाती असून त्यामध्ये ३ हजार १४२ कोटींच्या ठेवी आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ लाख ३१ हजार खाती असून त्यामध्ये ५८९ कोटींच्या ठेवी आहे.
प्रत्येक व्यक्ती हा बँक प्रणालीशी जोडला गेला पाहिजे या हेतूने केंद्र सरकारने २०१४-१५ मध्ये पंतप्रधान जन धन योजना सुरु केली होती. हे खाते कोणत्याही बॅलन्सशिवाय खाते उघडता येतात. या खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही. हे खाते उघडण्यासाठी वयोमर्यादा नाही.
पंतप्रधान जन धन खाते कोण उघडू शकते?
भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती पीएम जन धन खाते उघडू शकते, परंतु ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. तसेच जे लोक अद्याप बँकिंग प्रणालीशी जोडलेले नाहीत. तुम्ही हे खाते कोणत्याही बॅलन्सशिवाय उघडू शकता म्हणजेच शून्य शिल्लक. यासोबतच या खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही. हे खाते उघडण्यासाठी वयोमर्यादा नाही.
रुपे डेबिट कार्ड २ कोटी ५० लाख
जनधन खात्याबरोबरच खातेधारकाला रुपे डेबिट कार्डही दिले जाते. या कार्डवर सुरुवातीला एक लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जात होते. सरकारने २८ ऑगस्ट २०१८ नंतर उघडल्या जाणाऱ्या जनधन खात्यांबरोबरच अपघाती अर्थात दुर्घटना विम्याची रक्कम वाढवून २ लाख रुपये केली आहे. खातेधारकाचा दुदैवाने अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला ही दोन लाखांची रक्कम विमा स्वरुपात मिळू शकते. याशिवाय या खात्याबरोबर ३० हजार रुपयांचा जीवन विमाही असतो. खातेधारकाच्या मृत्यूनंतर वारस व्यक्तीला ही रक्कम मिळते. मात्र यासाठी दुर्घटना घडण्याच्या ९० दिवस आधी आपल्या खात्यातून किमान एकदा पैशांची देवाणघेवाण झालेली पाहिजे. या खात्यातून देशात कुठेही, कुणालाही पैसे पाठवता येतात. तसेच सरकारी योजनांचे पैसे थेट या खात्यात जमा होतात. आधार सिडींगमुळे शासकीय योजनांचा पैसा खात्यात येतो. जनधन खातेधारक पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना, अटल पेन्शन योजना आणि मुद्रा लोन योजनेसाठीही पात्र असतो.
खातेदार आणि ठेवी
ग्रामिण खातेदार – १ कोटी ९७ लाख
शहरी खातेदार – १ कोटी ६१ लाख
महिला खातेदार – २ कोटी ४ लाख
पुरुष खातेदार – १ कोटी ५४ लाख
बँकांकडून उघडली गेलेली खाती
बँक ऑफ महाराष्ट्र – ५३ लाख ४३ हजार
महाराष्ट्र ग्रामिण बँक – २९ लाख ३२ हजार
बँक ऑफ बडोदा – ४० लाख ७८ हजार
बँक ऑफ इंडिया – ३५ लाख ६२ हजार
सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया – १४ लाख ९३ हजार
स्टेट बँक ऑफ इंडिया – १ कोटी ६ लाख
रुपे डेबिट कार्ड
ज्यांचे खाते निष्क्रिय आहे त्यांनी ते खाते एक्टीव्ह करावे. जास्तीत जास्त खातेदारांनी रुपे कार्डचा वापर करावा. खातेधारकाचा दुर्देवाने अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला ही दोन लाखांची रक्कम विमा स्वरुपात मिळते.
मंगेश केदार, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक