देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत संजय राऊतांचे स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस-संजय राऊत भेटीचा खुलासा

shivsena-targets-bjp-on-sakinaka-case-dombivali-rape-news-update
shivsena-targets-bjp-on-sakinaka-case-dombivali-rape-news-update

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये भेट झाली. (Sanjay Raut on meeting with Devendra Fadnavis) त्या भेटीमागचे कारण संजय राऊत यांना स्पष्ट केले. ‘सामना’च्या मुलाखतीसाठी देवेंद्र फडणीस यांना बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. शनिवारी आम्ही भेटल्यानंतर गप्पा मारल्या एकत्र जेवण केले. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे काही आमचे शत्रू नाहीत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमागचे तर्कवितर्क आणि आडाखे लावले असतानाच या भेटीमागे काय कारण होतं ते समोर आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: फडणवीस भेटीमागील कारण स्पष्टपणे सांगितलं आहे.

काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस सध्या राज्याचे विरोधी पक्षनेता असून माजी मुख्यमंत्रीही आहेत. तसेच भाजपाने त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही.

फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. आमच्या या भेटीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण करोनाच्या काळामुळे शक्य झाली नाही, असेही राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची (26 सप्टेंबर) रोजी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही गुप्त भेट झाली होती. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल 2 तास ही भेट झाली. भेट झाल्यानंतर सुरुवातीला संजय राऊत यांनी या भेटीचा इन्कार केला. मात्र देवेंद्र फडणवीसांची पांढऱ्या रंगाची गाडी या हॉटेलमधून स्पष्टपणे बाहेर पडताना एका वृत्तवाहिनीने दाखलवले होते. त्यामुळे या भेटीचं बिंग फुटलं. मात्र आता संजय राऊतांकडून सारवासारव सुरु झाली आहे.

दानवे-राऊत यांचीही आठ दिवसांपूर्वीच भेट

भाजप नेते आणि केंद्रिय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी 18 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतल्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. “संजय राऊत यांची भेट घेण्यापाठीमागे कोणतंही राजकीय कारण नाही. महाराष्ट्रातल्या कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मी संजय राऊत यांची भेट घेतली”, असं दानवे यांनी सांगितलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here