वापरलेली चहा पावडरही उपयोगीच; फेकण्याआधी नक्की विचार करा!

do-uo-know-how-to-use-again-used-tea-powder-or-chahapatti-check-here-news-update
do-uo-know-how-to-use-again-used-tea-powder-or-chahapatti-check-here-news-update

चहा बनवून झाल्यानंतर साधारपणे चहाची पावडर फेकून दिली जाते. तुम्हीही असं करत असाल तर थांबा. चहा बनवल्यानंतर चहाची पावडर फेकून देऊ नका. कारण याचे फायदे अनेक आहेत. इतकंच नव्हे तर त्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. बहुतेक लोकांना चहाचे वेड असते. एका अहवालानुसार, भारतीय दिवसातून फक्त दोन कप चहा पितात. पण तुम्हाला माहिती आहे का यामुळे चहापत्तीचे खूप नुकसान होते कारण आपण एकदा वापरलेली चहापत्ती फेकून देतो. खरं तर, ही वापरलेली चहापत्ती खूप उपयुक्त आहे.

तुम्ही उरलेल्या चहापत्तीचा वापर स्वच्छतेसाठी करू शकता कारण चहापत्ती चिकटपणा काढून टाकण्यासाठी खूप चांगली असते. प्रथम चहापत्ती कोरडी करा. आता तुम्हाला जे काही साफ करायचे आहे जसे की चॉपिंग बोर्ड, भांडे, खिडक्या यावर चहापत्ती ठेवा आणि कापड किंवा स्क्रबरने घासून घ्या. भांडी साफ करण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो.

बागकामासाठीही चहाच्या पानांचा वापर करता येतो. होय. कारण चहापत्ती खूप चांगले खत बनवू शकते. तुम्ही चहापत्ती कोरडी किंवा कोरडी न करता देखील वापरू शकता. फक्त लक्षात ठेवा की जर तुम्ही त्यात जास्त साखर घातली असेल तर ते झाडांच्या मुळांना देखील नुकसान करू शकते. म्हणून वापरलेली चहापत्ती (साखर नसलेली) वाळवून रोपांच्या मातीजवळ ठेवा. ते फायदेशीर ठरते.

वापरलेल्या चहाची पावडर तुम्ही खत म्हणूनही वापरु शकता. उरलेली चहा पावडर गाळल्यानंतर फेकून न देता ती झाडांना घाला. यामुळे झाडांचे आरोग्य सुधारते.

चहामध्ये अँटी-ऑक्सिंडट हे गुण असतात. एखादी जखम अथवा झाल्यास त्यावर चहापावडरीचा लेप लावल्यास रक्तस्त्राव बंद होतो.

उरलेल्या चहा पावडरीमध्ये थोडीशी विम पावडर मिसळून क्रोकरी साफ केल्यास त्यांना चमक येते. 

दातदुखीचा त्रास होत असल्यास चहाची पावडर कोमट पाण्यात टाकून या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातदुखी बरी होईल. 

चहा पावडरचा उपयोग केसांमध्ये चमक आणण्यासाठीही होतो. यासाठी उऱलेली चहा गरम पाण्यात उकळवा. हे पाणी गाळून घ्या आणि पाणी थंड करुन या पाण्याने केस धुवा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here