E Rickshaw: इलेक्ट्रिक रिक्षांमुळे परमिट रिक्षा चालकांची गोची!

केंद्र सरकारतर्फे परमिटची सूट, आरटीओ, पोलिसांना कारवाई करता येईना

Due to electric rickshaws permit rickshaw drivers business effect!
Due to electric rickshaws permit rickshaw drivers business effect!

औरंगाबाद:इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक कंपन्यानी अनेक प्रकारची इलेक्ट्रिक रिक्षा E Rickshaw बाजारात आणली. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षांना परवाना नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक रिक्षा बिनधास्त चालत आहे. शहरात ५०० इलेक्ट्रिक रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. त्यांच्यावर आरटीओ, पोलिस विभागाला कारवाई करता येत नसल्यामुळे परमिट रिक्षा चालकांची चांगलीच गोची झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात परवानाधारक पेट्रोल रिक्षांची संख्या ४० हजारावर पोहोचली आहे. प्रवासी वाहतुकीवरून रिक्षा चालक विरुध्द आरटीओ, पोलिस प्रशासन असा वाद सुरुच असतो. परंतु इलेक्ट्रिक रिक्षा चालकांमुळे पेट्रोल रिक्षा चालकांची डोके दुखी वाढली आहे. इलेक्ट्रिक रिक्षा चालकांना परमिट नसल्यामुळे ते बिनधास्त तीन पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांकडून होत आहे. त्यामुळे परमिट रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. 

केंद्रीय मंत्रालयाने दिली सूट –                                                                                                                                      ई-रिक्षांना परवाना प्रवासी वाहतुकीसाठी परवान्याची गरज नाही. परंतुअन्य वाहनांप्रमाणेच ई-रिक्षांची आरटीओकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. वाहन चालकाकडे रिक्षा चालवण्याचे लायसन्स असणे गरजेचे आहे. असे २०१६ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे उपसचिव अभय दामले यांनी स्पष्ट केले होते.

नियम तोडणा-यावर कारवाई करु

इलेक्ट्रिक रिक्षा चालकांना परमिटची गरज नाही तसे केंद्राचे नियम आहे. केंद्रीय मंत्रालयातर्फे परवानगी देण्यात आली आहे. जर कुणी इलेक्ट्रिक रिक्षा चालक नियम तोडत असेल तर त्यांच्यावर कारवाई करु.- विजय काठोळे, प्र.आरटीओ.

आरटीओ, पोलिसांकडे तक्रार…

आरटीओ, पोलिस विभागाकडे नियम तोडणा-या इलेक्ट्रिक रिक्षा चालकांविरोधात तक्रार केली आहे. इलेक्ट्रिक रिक्षा चालकांवर कारवाई होत नाही. त्यांना परमिट नसल्यामुळे ते बिनधास्त तीन पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.

निसार अहेमद खान, अध्यक्ष रिक्षा चालक मालक समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here