रोहित पवारांना ईडीची भीती, म्हणाले…

Ncp-mla-rohit-pawar-warns-youth-about-government-report-containing-a-detailed-toolkit-for-media-management
Ncp-mla-rohit-pawar-warns-youth-about-government-report-containing-a-detailed-toolkit-for-media-management

नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस मिळालेली आहे. त्यावरून चांगलेच राजकारण तापले. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी मोठ विधान केलं आहे. भाजप सक्तवसुली संचलनालयाचा Enforcement directorate वापर करुन विरोधकांना लक्ष्य करत आहे. उद्या मलाही ‘ईडी’EDची नोटीस येऊ शकते, अशी शक्यता आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

मंगळवारी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘ईडी’कडून राजकीय नेत्यांना पाठवण्यात येणाऱ्या नोटिसांविषयी शंका उपस्थित केली. हा राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रकार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. 

भाजपकडून ईडीचा वापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीची कारवाई होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून केंद्रातील भाजप सरकारवर आरोप होत आहेत. या प्रकारामुळे सत्ताधारी विरुध्द विरोधक असा सामना रंगला आहे. 

काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. तेव्हापासून शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून ‘ईडी’च्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे. 

तशा वाटाघाटी आणि समीकरणे जुळून आली पाहिजेत

महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतात. पण तशा वाटाघाटी आणि समीकरणे जुळून आली पाहिजेत. पदवीधर आणि विधान परिषद निवडणुकीत एकत्रित ताकद मोठी असल्याचे दिसून आले. त्यामुळे आगामी काळातही भाजपाच्या विचारधारेला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित लढेल. पण शेवटी हा निर्णय तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते घेतील, असे रोहित पवार यांनी सांगितले.

यह भी पढ़ें : New Covid Strain: ब्रिटेन में फिर सख्त लॉकडाउन लागू

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here