अनिल देशमुखांची रवानगी तुरूंगात होणार!

भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचं मोठं विधान

kolhapur-anil-ncp-mla-deshmukh-on-jayant-patil-ed-inquiry-ncp-bjp-in-marathi-news-update-today
kolhapur-anil-ncp-mla-deshmukh-on-jayant-patil-ed-inquiry-ncp-bjp-in-marathi-news-update-today

मुंबई : सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) Enforcement Directorate Raid  आज (शुक्रवार) सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्या नागपूर, मुंबई येथील निवासस्थानी छापे टाकले. या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करत, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक मोठं विधान केलं आहे. काही दिवसांनी अनिल देशमुखांची रवानगी तुरूंगात होणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा ईडी आणि सीबीआयने तपास करावा;शिवसेनेचा सल्ला

अनिल देशमुखचा घरी आज ED ईडीचे छापे, काही दिवसांनी जेलमधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकाता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्या मधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्या मुळे ३ वर्ष जेल मधे होते. काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार. असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

तसेच, ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वसूली मिनिस्टर अनिल देशमुखांच्या घरी छापा मारला. मला खात्री आहे काही दिवसांनी ते तुरूंगात असतील. दुसरे वसुली मिनिस्ट अनिल परब यांचे देखील अनिल देशमुखांप्रमाणेच होईल. असंही किरीट सोमय्यांनी ट्विट केलं आहे.

हेही वाचा: Anil Deshmukh l अनिल देशमुखांच्या नागपूर,मुंबईतील बंगल्यावर ईडीची छापेमारी!

गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here