मुंबई: अघोषित शाळा आणि त्रुटी पूर्तता झालेल्या शाळांच्या याद्या धोरणाबाबत शिक्षकांचे सध्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. याबाबत विविध शिक्षक संघटनांनी आज मंगळवार १ नोव्हेंबररोजी शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याशी मंत्रालयात चर्चा केली. यावेळी केसरकरांनी अघोषित शाळांच्या याद्या व त्रुटी पूर्तता झालेल्या याद्या बाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन १५ नोव्हेंबरला घोषित करु असे आश्वासन दिले. व उद्या २ नोव्हेंबरला पुन्हा याबाबत खाजगी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघ, महाराष्ट्र राज्य यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. असे पत्राव्दारे कळविले.
दि. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी आमदारांना सोबत घेऊन विधान भवना समोर धरणे आंदोलन केले होते. तेथे शिक्षणमंत्र्यानी येऊन मी दि. १ नोव्हेंबरला सर्व शिक्षक आमदारांची बैठक घेतो व निर्णय जाहीर करतो असे सांगितले होते. आज मंत्रालयात समिती सभागृहात हि बैठक संपन्न झाली. सर्व शिक्षक आमदार उपस्थित होते. आ. विक्रम काळे यांनी यापुढे सर्व शाळांना प्रचलित धोणानुसार शंभर टक्के अनुदान द्यावे त्रुटी पूर्तता व अघोषित शाळा वर्ग तुकड्यांच्या याद्या तातडीने घोषित करून अनुदान द्यावे व आज राज्यभर सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन साठी काळा दिवस साजरा केला आहे.
आजच वर्तमाणपत्रमध्ये राजस्थान व पंजाब सरकारच्या जुनी पेन्शन योजना लागू केल्या बाबत जाहिराती आहेत. त्यामुळे शिंदे सरकारने सुद्धा जुन्या पेन्शन बाबत निर्णय करावा हि पण एक सर्व आमदारांनी एकमुखी मागणी केली. त्यावेळी दि. १५ नोव्हेंबर ला त्रुटी पूर्तता व अघोषित च्या सर्व याद्या जाहीर करणार प्रचलित धोरणा बाबत व पेन्शन बाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असे शेवटी ना. दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.