स्कॉर्पिओवर वाळूने भरलेला ट्रक उलटला, ८ जण ठार

eight-people-were-killed-after-a-truck-overloaded-with-sand-toppled-over-and-fell-on-a-car
eight-people-were-killed-after-a-truck-overloaded-with-sand-toppled-over-and-fell-on-a-car

कौशांबी l उत्तर प्रदेशमधील Uttar Pradesh कौशांबी येथे भीषण अपघात Kaushambi Accident  झाला. वाळूने भरलेला एक ट्रक स्कॉर्पिओवर पलटी झाला. यामध्ये ८ जण ठार झाले. eight people killed

अपघातग्रस्त स्कॉर्पिओ कारमधील लोकं हे एक लग्न समारंभ आटोपून आपल्या घरी परतत होते. त्याचवेळी कौशांबीमध्ये त्यांचा भीषण अपघात झाला.

वाळूने भरलेला एक ट्रक अचानक कारवर पलटी झाल्यामुळे हा भयंकर अपघात झाला आहे. ज्या कारवर वाळूने भरलेला ट्रक पलटी झाला त्या कारमध्ये १० लोक होते.

त्यापैकी ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना कौशांबीच्या देवीगंज चौक येथे घडली आहे. हा अपघात आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास झाला.

अपघातग्रस्त स्कॉर्पिओ कारमधील लोकं हे एक लग्न समारंभ आटोपून आपल्या घरी परतत होते. त्याचवेळी कौशांबीमध्ये त्यांचा भीषण अपघात झाला.

ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा ही कार एके ठिकाणी उभी होती. पण अचानक वाळूने भरलेला एक ट्रक अनियंत्रित झाला आणि थेट कारवर येऊन उलटला.

हेही वाचा : यूपीतील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’; मनसेचा योगींवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here