एकनाथ खडसेंना शिवसेनेची ऑफर!

eknath-khadse-gets-offer-from-Minster uday-samant-to-join-shiv-sena-
एकनाथ खडसेंना उदय सामंतांकडून शिवसेनेची ऑफर eknath-khadse-gets-offer-from-Minster uday-samant-to-join-shiv-sena-

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे पक्षश्रेष्ठीवर नाराज आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्रासाबद्दल खडसे जाहीरपणे बोलत आहे. शिवसेना नेते ना. उदय सामंत यांनी खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्यावर ही वेळ येणं दुर्देवी आहे. त्यांनी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करण्यास हरकत नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

खडसे यांचा हा पक्षांतर्गत विषय आहे. परंतू भविष्यात जर ते कोणत्या पक्षाचा विचार करत असतील तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करण्यास हरकत नाही. एका ज्येष्ठ नेत्यावर जर भाजपामध्ये अशी वेळ येत असेल तर ते दुर्देवी आहे

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी वारंवार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. “या महाराष्ट्रात मला एकाच व्यक्तीनं छळलं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काय उद्योग केले हे मला माहिती आहे. उगाचच मला बदनाम करुन तिकीट न देण्यामध्ये त्यांचाच हात होता” असा थेट आरोप खडसे यांनी केला आहे.

खडसेंची ही नाराजी लक्षात घेता उदय सामंत यांनी त्यांना भविष्यात शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. खडसे कोणत्या पक्षात प्रवेश घेतील याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here