एकनाथ खडसेंच्या गाडीचं टायर फुटल्यानं अपघात,बालंबाल बचावले

eknath-khadse-ncp-leader-car-accident-after-tyre-burst
eknath-khadse-ncp-leader-car-accident-after-tyre-burst

अळमनेर l  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. अमळनेरवरून जळगावकडे येत असताना गाडीचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला. सुदैवानं यात एकनाथ खडसे Eknath khadse यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत.

एकनाथ खडसे यांनी ट्विट करून ही माहिती दिली. एकनाथ खडसे Eknath khadse हे आज रविवार (१ नोव्हेंबर) अमळनेर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते गाडीने जळगावकडे येत असताना धरणगाव जवळ गाडीचे टायर फुटले. गाडीचा वेग कमी असल्यानं व चालकाने प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली.

या गाडीत एकनाथ खडसे Eknath khadse यांच्यासह काही कार्यकर्तेही होते. सगळे जण सुखरूप आहेत. एकनाथ खडसे यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली.

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत –एकनाथ खडसे

“आज अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडीचा वेग कमी असल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही,” अशी माहिती खडसे यांनी दिली.

हेही वाचा l facebook Dark Mode l फेसबुकचा ‘डार्क मोड’ लाँच

एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर एकनाथ खडसे यांचे जोरदार दौरे सुरु आहेत. राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी एकनाथ खडसे जुन्या कार्यकर्त्यांच्या,नेत्यांच्या भेठीगाठी घेत आहेत. काही दिवसांमध्ये भाजपाला खिंडार पाडण्यासाठी एकनाथ खडसेंच दौरे सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here