दिल्लीत निवडणूक आयोगाची आज बैठक, ५ राज्यांत होणार विधानसभा निवडणुका

election-commission-meeting-today-to-fix-the-schedule-for-assembly-elections-in-5-states
election-commission-meeting-today-to-fix-the-schedule-for-assembly-elections-in-5-states

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाची दिल्लीत आज (बुधवार, २४ फेब्रुवारी २०२१) बैठक Election-commission-meeting आहे. या बैठकीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या Assembly Election तयारीचा आढावा घेतला जाईल. या बैठकीनंतर लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. एप्रिल-मे २०२१ दरम्यान निवडणुकांची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल, तामीळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्य तसेच पुदुचेरीबाबत आढावा

निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात आज सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणुकांसाठीच्या तयारीचा आढावा घेतला जाईल. पश्चिम बंगाल, तामीळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्यांचा समावेश आहे.

तसेच पुदुचेरी हा एक केंद्रशासीत प्रदेश अशा पाच ठिकाणी विधानसभेची निवडणूक घेण्यासाठी तयारी सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग याच आठवड्यात पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. 

वाचा: पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाही;शिवसेनेचा भाजपला इशारा

निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था राखणे याला निवडणूक आयोग सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. पश्चिम बंगाल, तामीळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरी येथे निवडणूक काळात कशा प्रकारे बंदोबस्त ठेवायचा या संदर्भात निवडणूक आयोगाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस यांच्यात समन्वय ठेवून बंदोबस्त ठेवला जाणार आहे. 

पश्चिम बंगालमधील ६ हजार ४०० बूथ संवेदनशील

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक काळात कशा प्रकारे बंदोबस्त ठेवायचा यावर जास्त चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील ६ हजार ४०० बूथ संवेदनशील जाहीर केले आहेत.

वाचा: FASTag कडून टोलवर कट झाले जास्त पैसे? नो टेन्शन, Paytm देणार रिफंड

निवडणूक आयोगाचे उपायुक्त सुदीप जैन गुरुवारी दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ते परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणूक आयोगाला तयारीबाबत ताजी माहिती देणार आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here