औरंगाबाद: मनपा प्रशासक जी. श्रीकांत commissioner G shrikant यांनी रस्त्यावरील अतिक्रमणे प्राधान्याने हटवा,असे आदेश महापालिका अधिका-यांना दिले आहे. परंतु महापालिकेच्या स्वामी विवेकानंद उद्यान एन-१२ Swami Vivekanand Garden N-12 Auragabad च्या मुख्य प्रवेशव्दारातच विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. उद्नातील कर्मचा-यांच्या आशीर्वादाने विक्रेते बसले असून येणा-या जाणा-या नागरिकांना, बच्चे कंपनीला त्रास सहन करावा लागत आहे. प्रवेशाची अर्धी बाजू बंद करुन जोरात व्यवसाय सुरु आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
टीव्ही सेंटर परिसरात मोठ्या वसाहती आहे. मोठ्या वसाहती, विद्यार्थी, वयोवृध्द नागरिक, बच्चे कंपनी, पोलिस भरतीची तयारी करणारे विद्यार्थ्यांना महापालिकेचे स्वामी विवेकानंद उद्यान एन-१२ टीव्ही सेंटर नेहमीच गजबजलेले असते. या भागात विवेकानंद उद्यानात आजूबाजूच्या परिसरातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. उद्यानाचे महापालिकेने चांगल्या प्रकारे कामही केले. दररोज मोठी गर्दीही असते. परंतु उद्यानात येताच मुख्य प्रवेशव्दारातील विक्रेत्यांमुळे हिरमोड होत असल्याचे चित्र आहे.
स्वामी विवेकानंद उद्यानाकडे महापालिका अधिका-यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे उद्यानातील कर्मचारी काय करतात. त्यांच्या कामकाजाकडे कुणाचेही लक्ष नसून ड्यूटीपेक्षा कर्मचारी टवाळखोरांना सोबत घेऊन बसण्यात व्यस्त असतात. उद्यानासमोर विक्रेत्यांकडून चिरीमीरी करुन त्यांना आपले व्यवसाय करु देतात अशा तक्रारी पुढे येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासक काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी…
मनपा प्रशासक जी.श्रीकांत यांच्याकडे नागरिकांनी थेट फोटो पाठवून याकडे लक्ष देण्याची व कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांनी थेट स्वामी विवेकानंद उद्यानातील कर्मचारी चिरीमीरी करुन विक्रेत्यांना मदत करत आहेत. याची चौकशी करा अशीच तक्रार केली आहे. नागरिकांनी चिरीमीरी करणा-या कर्मचा-यांचे फोटो प्रशासकांना पाठवले आहे.
स्वामी विवेकानंद उद्यानातील कर्मचारी करतात चिरीमिरी
स्वामी विवेकानंद उद्यानातील कर्मचारी पैसे घेऊन विक्रेत्यांना प्रवेशव्दारातच बसू देतात. प्रवेशव्दारातच चिप्स, खेळणीवाले. कुल्फीवाले, मोसंबी ज्यूसवाले,घोडेवाल्यांनी अतिक्रण केले आहे. त्यांच्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.