Eknath khadse l एकनाथ खडसेंना ईडीकडून मोठा धक्का; जमीन घोटाळा प्रकरणी जावयाला अटक

enforcement-directorate-arrest-ncp-leader-eknath-khadse-son-in-law-in-pune-midc-land-deal-case
enforcement-directorate-arrest-ncp-leader-eknath-khadse-son-in-law-in-pune-midc-land-deal-case

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे Eknath khadse यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी)Enforcement Directorate मोठा धक्का दिला आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार Pune Midc Land प्रकरणी गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

गिरीश चौधरी मंगळवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या कागदपत्रांची ईडीकडून तपासणी करण्यात आली.

याआधी ईडीकडून भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी जानेवारी महिन्यात एकनाथ खडसेंची चौकशी करण्यात आली होती. माजी भाजपा नेते असणारे एकनाथ खडसे यांना ईडीने डिसेंबर महिन्यातच चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावलं होतं.

यानंतर एकनाथ खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. आपण भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी यावेळी केला होता.

ईडीने यावेळी एकनाथ खडसे अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालानुसार (ECIR) आरोपी नाहीत, मात्र जर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर अटक केली जाऊ शकते असं स्पष्ट केलं होतं. २०१८ मध्ये २२ पानांच्या  रिपोर्टमध्ये एसीबीने एकनाथ खडसेंनी क्लीन चीट दिली होती.

एकनाथ खडसे याआधी राज्याचे महसूल मंत्री होती. जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती दिनकर जोतिंग यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन करण्यात आली होता.

हेही वाचा 

…मग वर्षभरापासून राज्यपालांनी 12 आमदारांची दाबलेली यादी लोकशाहीची हत्या नाही का?

Dilip Kumar l ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

  Dilip Kumar Death: बॉलीवुड के दिग्गज एक्टर दिलीप कुमार का निधन, 98 साल में दुनिया को कहा अलविदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here