प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक

अमित चांदोळे हे टॉप्स समूहाचे भागीदार,आज विहंग सरनाईक यांची चौकशी

enforcement-directorate-has-arrested-one-amit-chandole-in-an-alleged-money-laundering-case-related-to-tops-security
enforcement-directorate-has-arrested-one-amit-chandole-in-an-alleged-money-laundering-case-related-to-tops-security

मुंबई l ‘टॉप्स सिक्युरिटी’ Tops Security या समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने Enforcement Directorate शिवसेना आमदार प्रताप सरनाईक Pratap Sarnaik यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यानंतर याप्रकरणी ईडीने बुधवारी २५ नोव्हेंबर संध्याकाळी पहिली अटक केली. सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चांदोळे Amit Chandole यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. चांदोळे हे टॉप्स समूहाचे भागीदार आहेत.

चांदोळे यांच्या अटकेमुळे सरनाईक आणि राहुल नंदा यांच्यातील व्यवहारांबाबत माहिती समोर येईल अशी ईडीला आशा आहे. नंदा हे टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आहेत. या ग्रुपचे माजी सीईओ रमेश अय्यर यांनी नंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कंपनीच्या निधीचा बेकायदा पद्धतीने फेरफार केल्याचा आरोप केला आहे.

ईडीने परदेशी बँकेचं एक डेबिट कार्ड जप्त केलं

सरनाईक यांच्या कार्यालयावर मंगळवारी छापेमारीदरम्यान ईडीने परदेशी बँकेचं एक डेबिट कार्ड जप्त केलं आहे. फ्रिमोन्ट बँकेने प्रताप सरनाईक यांच्या नावे हे डेबिट कार्ड इश्यू केलं आहे. ज्यावर अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील फरहाद दाद्रास येथील पत्ता आहे.

ईडीला या छापेमारीत पैशांच्या व्यवहारांच्या काही नोंदी आणि कागदपत्रे आढळून आले आहेत. या नोंदी हवाला व्यवहारांच्या असल्याचे दर्शवत आहे. ज्या कंपन्यांबाबतच्या या नोंदी आहेत त्या प्रताप सरनाईक यांच्याकडून चालवल्या जातात.

हेही वाचा l ‘लवकर लस येऊ दे, अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे’; अजित पवार यांचं विठुराया चरणी साकडं

दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक परदेशातून मुंबईत परतल्याने सध्या क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यांचा क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर ईडीद्वारे त्यांची प्रत्यक्ष चौकशी करण्यात येईल.

त्याला काळा पैसा म्हणून संबोधले जाते

एखाद्या भारतीय व्यक्तीचे परदेशातील बँकेत खातं आहे आणि या खात्यावरील व्यवहारांची माहिती त्याने कर विभागाकडे दिलेली नसल्यास त्याला काळा पैसा म्हणून संबोधले जाते. यासाठी Black Money Undisclosed Foreign Income and Assets and Imposition of Tax Act, 2015 दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. या कायद्यांतर्गत हे प्रकरणी येत असल्यास मनी लाँडरिंग प्रकरणी देखील संबंधीतावर कारवाई होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here