प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात

पूर्वेश सरनाईक यांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरु

enforcement-directorate-officials-detain-shivsena-mla-pratap-sarnaik-son-vihang-sarnaik
enforcement-directorate-officials-detain-shivsena-mla-pratap-sarnaik-son-vihang-sarnaik

मुंबई l शिवसेना आमदार प्रताप सरनाईक Pratap Sarnaik यांच्या घऱी सकाळी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. मुंबई तसंच ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी ईडीकडून शोधमोहीम सुरु आहे.प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक Purvesh Sarnaik, विहंग सरनाईक Vihang Sarnaik यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं होतं. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं.

विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक रवाना झालं आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसंच कोंडी करण्यासाठी कारवाई केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी एका वृत्तनाहिनीशी बोलताना या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईचं स्वागत केलं आहे.

 काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे.

हेही वाचा l MLA Pratap Sarnaik ED Raid | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर,कार्यालयावर ईडीची छापेमारी

तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

हेही वाचा l “आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही,”सरनाईकांविरोधातील कारवाईनंतर संजय राऊत संतापले

“ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. मी दौऱ्यात असल्याने मला याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here