अमरिंदर सिंहांचा भाजप प्रवेश निश्चित,अमित शहांसोबत दिल्लीत खलबतं!

ex-cm-punjab-amarinder-singh-bjp-leader-home-minister-meets-amit-shah-in-delhi
ex-cm-punjab-amarinder-singh-bjp-leader-home-minister-meets-amit-shah-in-delhi

नवी दिल्ली l पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Ex CM of Punjab Amarinder Singh meets Amit Shah in Delhi) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची आज दिल्लीत भेट घेतली. अमरिंदर सिंह काँग्रेसमध्ये (Talks of Amarinder Singh to join BJP) नाराज असून लवकरच भाजपात प्रवेश करणार याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. 

मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर भाजप प्रवेश निश्चित…

पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादानंतर अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. काँग्रेसनं चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. मुख्यमंत्रीपदानंतर आता अमरिंदर सिंह काँग्रेसला रामराम ठोकतील, हे जवळपास निश्चित झालं आहे.

सलग दुसरा धक्का

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला जोरदार धक्का बसला होता. या घटनेला 24 तास उलटायच्या आतच हा काँग्रेसला बसलेला दुसरा धक्का मानला जात आहे.

ज्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामुळे पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून यायला सुरुवात झाली होती आणि अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं, ते नवज्योत सिंग सिद्धूदेखील बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचं चित्र पंजाबमध्ये मंगळवारपासून निर्माण झालं होतं.

हेही वाचा 

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा !: नाना पटोले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here